virat kohli character will see in sonam kapoor the zoya factor | काय म्हणता? सोनम कपूरच्या सिनेमात ‘विराट कोहली’ची एन्ट्री, व्हायरल झाला व्हिडीओ

काय म्हणता? सोनम कपूरच्या सिनेमात ‘विराट कोहली’ची एन्ट्री, व्हायरल झाला व्हिडीओ

ठळक मुद्दे‘द जोया फॅक्टर’ या सिनेमात सोनम कपूर व दलकीर सलमान लीड रोलमध्ये आहेत. याशिवाय अंगद बेदी, संजय कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांचा ‘द जोया फॅक्टर’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झालाय. पण तूर्तास हा आगामी सिनेमा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, या चित्रपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. कारण या व्हिडीओत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दिसतोय.
‘द जोया फॅक्टर’मध्ये विराटने अभिनय केलेला नाही. पण या व्हिडीओत तो सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतोय. व्हिडीओत विराटने एक लॉकेट घातलेले आहे. या लॉकेटमध्ये सोनम कपूरचा फोटो आहे.

व्हिडीओत विराट ड्रेसिंग रूममध्ये तयार होतोय. बॅकग्राऊंडमध्ये कमेंट्रेटरचा आवाज आहे. ‘भारत के दोनों औपनर बल्लेबाज आऊट हो चुके हैं. अब विराट कोहली का नंबर है. कहा जाता है कि विराट कोहली अब जोया फैक्टर मानने लगे हैं. देखना है कि क्या जोया फैक्टर काम करेगा,’ असे कमेंट्रेटर म्हणतोय. कमेंट्रेटरच्या या कमेंट्रीसोबतच विराट कोहली ड्रेसिंग रूममधून सोनम कपूरचा फोटो असलेले लॉकेट घालून मैदानाकडे चालू लागतो.
हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मजेदार यासाठी की, या व्हिडीओतील विराट कोहली खरा विराट कोहली नाही तर त्याचा डुप्लिकेट आहे. होय, तो कोण तर टिक टॉक स्टार गौरव अरोरा. गौरव हा टिक टॉकवर विराट कोहलीचा डुप्लिकेट म्हणून लोकप्रिय आहे. त्याचा चेहरा हुबेहुब विराटसारखा आहे.


‘द जोया फॅक्टर’च्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये हाच गौरव अरोरा विराट कोहली बनला आहे. सोनमने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘द जोया फॅक्टर’ या सिनेमात सोनम कपूर व दलकीर सलमान लीड रोलमध्ये आहेत. याशिवाय अंगद बेदी, संजय कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा अनुजा चौहान लिखीत एका कादंबरीवर आधारीत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: virat kohli character will see in sonam kapoor the zoya factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.