ठळक मुद्देसाक्षीच्या अफेअरच्या बातम्याही चवीने चघळल्या गेल्या होत्या. बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेसोबत त्याचे नाव जोडले गेले होते.

70 च्या दशकात  प्रसिद्धीच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी काही काळ अध्यात्माची वाट धरली होती. ओशो रजनीश यांचे शिष्यत्व पत्करून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर करून त्यांनी अनेकांना धक्का दिला होता. आता विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना यानेही पित्याच्या पावलावर पाऊल टाकत, अध्यात्माचा मार्ग जवळ केल्याचे कळतेय. होय, सूत्रांचे खरे मानाल तर साक्षीने ओशो इंटरनॅशनल जॉईन केले आहे.

साक्षी हा विनोद खन्ना यांच्या दुसºया पत्नी कविताचा मुलगा आहे. विनोद खन्नांनी ओशोंचे शिष्यत्व पत्करले त्या काळात ते बॉलिवूडपासून दुरावले होते. संन्यास घेण्याच्या अनपेक्षित निर्णयामुळे कौटुंबिक आयुष्यातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पहिली पत्नी त्यांना सोडून गेली होती. (पहिल्या पत्नीपासून त्यांना  अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन मुलं आहेत.) यानंतर 1990 मध्ये विनोद यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले होते. या दोघांना साक्षी आणि श्रद्धा अशी दोन मुले झालीत. हाच साक्षी आता ओशोंचा शिष्य बनला असल्याचे कळतेय.

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात साक्षी  संजय लीला  भन्साळींचा असिस्टंट डायरेक्टर होता. यानंतर भन्साळी साक्षीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार, अशी बातमी आली होती. पण प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. यानंतर 4 वर्षांपूर्वी पुन्हा एकदा साक्षीच्या डेब्यूची चर्चा रंगली होती. मिलन लुथरियाच्या सिनेमातून साक्षीचा डेब्यू होणार, असे सांगितले गेले होते. पण हा डेब्यूही होता होता राहिला.

याचदरम्यान साक्षीच्या अफेअरच्या बातम्याही चवीने चघळल्या गेल्या होत्या. बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेसोबत त्याचे नाव जोडले गेले होते. दोघेही अनेकदा बॉलिवूडच्या पार्ट्यांना सोबत दिसायचे. अर्थात दोघांनी रिलेशनशिप कधीही मान्य केले नाही. 2011 मध्ये साक्षी रेव्ह पार्टीमध्ये पकडला गेला होता. यावेळी त्याने ड्रग्स घेतल्याचे आरोप धुडकावून लावले होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: vinod khanna youngest son sakshi takes the spiritual path like his father was osho follower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.