Vinay Sinha, the creator of the movie 'Anju Apna Apna' | ‘अंदाज अपना अपना' सिनेमाचे निर्माते विनय सिन्हा यांचे निधन

‘अंदाज अपना अपना' सिनेमाचे निर्माते विनय सिन्हा यांचे निधन

‘अंदाज अपना अपना ' या सुपरहिट सिनेमाचे निर्माते विनय सिन्हा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नसून आमिर खानने सोशल मीडियावर निधनाची बातमी सांगत श्रद्धांजली वाहिली आहे. विनय सिन्हा यांनी १९८३ साली ‘चोर-पोलीस’ आणि १९९७ साली ‘नसीब’ या सिनेमांचीदेखील निर्मिती केली होती. मात्र अंदाज अपना अपना सिनेमाने विनय सिन्हा यांची वेगळीच ओळख निर्मा केली होती. आजही या सिनेमाने रसिकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान टिकवून ठेवले आहे. सिनेमात आमिर खान आणि सलमान खानची जोडी आजही रसिकांना तितकीच आपलीशी वाटते. विनय सिन्हा यांच्या अचानक एक्झिटने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Vinay Sinha, the creator of the movie 'Anju Apna Apna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.