ठळक मुद्देविजय लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या ‘फायटर’ या सिनेमातून त्याचा बॉलिवूड डेब्यू होतोय.

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार.  ‘अर्जुन रेड्डी. हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. लवकरच विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. साहजिकच तरूणाई त्याला बघण्यास आतूर आहे. पण तूर्तास काय तर विजय त्याचा चेहरा लपवताना दिसतोय. होय, पापाराझींपासून (paparazzi)  वाचण्यासाठी विजय देवरकोंडाने असा काही जुगाड केला की त्याच्यासोबत असलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाचे  (Rashmika Mandanna) हसून हसून पोट दुखले.

होय, शनिवारी विजय देवरकोंडा व रश्मिका दोघेही हैदराबादेतील एका जिमबाहेर दिसले आणि पापाराझींच्या कॅमे-यांनी त्यांचे फोटो घेण्यास सुरुवात केली. पापाराझींपासून बचाव करण्यासाठी विजय देवरकोंडाने काय केले तर आपल्या टोपीने चेहरा झाकून घेतला. त्याचा तो फनी अवतार पाहून सोबत असलेली रश्मिका जोरजोरात हसू लागली.

चेह-यावर मास्क आणि डोळ्यांपर्यंत पुढे ओढलेली टोपी अशाच फनी अवतारात विजय देवरकोंडा गाडीत जाऊन बसला.
विजय देवरकोंडा व रश्मिका मंदानाने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर क्रॉमेड’ या सिनेमात एकत्र काम केले. हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते. विजय लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या ‘फायटर’ या सिनेमातून त्याचा बॉलिवूड डेब्यू होतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे झळणार आहे.  

फोर्ब्सने जारी केलेल्या ३० वर्षांहून कमी वयाच्या श्रीमंत कलाकारांमध्ये विजय देवरकोंडाचे नाव आहे. आश्चर्य वाटेल, पण विजय 25 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बँक अकाऊंटमध्ये 500 रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती. त्यामुळे बँकेने त्याचे अकाऊंट लॉक केले होते. पण केवळ पाच वर्षांत विजय ‘फोर्ब्स इंडिया’च्या 30 वर्षांहून कमी वयाच्या श्रीमंत कलाकारांमध्ये जाऊन बसला.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: vijay deverakonda hides his face from paparazzi which leaves rashmika mandanna laughing out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.