ठळक मुद्देविजयच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच ‘कबीर सिंग’ नावाने रिलीज होतोय

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. याच विजयने अलीकडे आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. पण साधासुधा नाही तर चांगले नऊ ट्रक भरून आइस्क्रीम वाटून. होय, आश्चर्य वाटले ना पण हे खरे आहे.

आपल्या वाढदिवशी विजयने चाहत्यांना एक अनोखी भेट दिली. त्याने काय केले तर, पाच राज्यांतील सात शहरात भरभरून आइस्क्रीम वाटले. हैदराबाद, विजयवाडा, तिरुपती, बंगळुरू, चैन्नई आणि कोची या पाच शहरात त्याने आइस्क्रीमचे वाटप केले. यासाठी तब्बल ९ ट्रक आइस्क्रीम लागले.

हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात त्याने स्वत: जाऊन चाहत्यांना आइस्क्रीम वाटले. गत वषीर्ही विजयने सुमारे ४ ते ५ हजार आइस्क्रीम वाटले होते.
गत चार वर्षांत विजयने अनेक चित्रपट केलेत. पेली चुपूलू, अर्जुन रेड्डी, महानती, गीता गोविंदम, टॅक्सी ड्राईव्हर अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. यापैकी अर्जुन रेड्डीला अभूतपूर्व यश मिळाले. या यशाची चव अद्यापही विजय चाखतोय.

यंदा ‘फोर्ब्स’ने जारी केलेल्या ३० वर्षांहून कमी वयाच्या श्रीमंत कलाकारांमध्ये विजय देवरकोंडाचे नाव आहे. आश्चर्य वाटेल, पण विजय २५ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बँक अकाऊंटमध्ये ५०० रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती. त्यामुळे बँकेने त्याचे अकाऊंट लॉक केले होते. पण केवळ पाच वर्षांत विजय ‘फोर्ब्स इंडिया’च्या ३० वर्षांहून कमी वयाच्या श्रीमंत कलाकारांमध्ये जाऊन बसला.
विजयच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच ‘कबीर सिंग’ नावाने रिलीज होतोय. यात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: vijay devarakonda birthday treat icecream for fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.