ठळक मुद्दे विद्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती.

‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विद्या माळवदे रूपेरी पडद्यावर नाही पण सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. होय, काही दिवसांपूर्वी शेअर केलेले तिचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 
खरे तर विद्याचे हे फोटो काही दिवस जुने आहेत. पण आज हे फोटो अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसले.
या फोटोंमध्ये विद्याने पिंक कलरची बिकनी घातलेली दिसतेय.  

विद्या दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब दिसतेय. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.


विद्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली.

त्यानंतर तिने  माशूका,  बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या.


रुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेल्या  ‘चक दे इंडिया’ या सिनेमात शाहरुख खानने साकारलेला महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक कबीर खान साºयांच्या पसंतीस पात्र ठरला. या सिनेमात महिला हॉकी संघाला जेतेपद मिळवून देण्यात कबीर खान कशारितीने यशस्वी ठरतो हे दाखवण्यात आले होते. याच महिला हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवले होते अभिनेत्री विद्या माळवदे हिने.


सिनेमाच्या क्लायमेक्समध्ये निर्णायक क्षणी विद्या भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावते असे दाखवण्यात आले होते. मराठमोळी अभिनेत्री असलेल्या विद्यावर या भूमिकेनंतर कौतुकाचा वर्षाव झाला होता. 

Web Title: vidya malvade flaunts in a bikini see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.