‘एक प्यार नगमा है गाण्यामुळे रानू मंडल रातोरात स्टार बनली. सध्या सर्वत्रच रानू मंडलचीच चर्चा ऐकायला मिळतेय. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडलने स्वप्नातही केला नसेल. आज रानु मंडल एक सेलिब्रेटी बनली आहे. त्यामुळे जिथे जिथे रानु मंडल दिसते. तिचे चाहते आपसुकच तिच्याशी भेटायला येतात आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र याच चाहत्यांच्या काही गोष्टी रानू मंडलला आवडत नाहीत. रानू मंडलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रानू आता सामान्य नसून सेलिब्रेटी बनली असल्याचा सांगत त्या चाहतीला शाब्दिक फटकारत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे  एका ठिकाणी रानू मंडल दिसताच एक चाहती रानू जवळ येते आणि हात लावून बोलण्याचा प्रयत्न करते. चाहतीचे रानूला अशा प्रकारे हात लावणे अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे ती रागात ''डोन्ट टच मी, आय एम सेलिब्रेटी नाऊ'' असे बोलताना दिसत आहे. यावरून स्टारडम  मिळाल्यामुळे रानू मंडलच्या डोक्यात हवा गेल्याचे चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर रानूचे असे वागणे अजिबात नेटीझन्सना पटलेले नाही. त्यामुळे युजर्सही रानूबद्दल राग व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


लवकरच रानू मंडलवर सिनेमा बनणार आहे. या बायोपिकचे काम सुरू झाले आहे. तिचे ऑफिशअल फेसबुक पे ज तयार करण्यात आले आहे. या पेजवर तिच्याविषयी सगळी माहिती शेअर केली जात आहे. विशेष म्हणजे या पेजला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2 लाखांहून अधिक लोकांनी या पेजला लाइक केले आहे. 


विशेष म्हणजे गायक हिमेश रेशमियानेच रानूला पहिली गाण्याची संधी दिली. त्याचा आगामी सिनेमा 'हॅप्पी हार्डी अँड हीर' मधील 'तेरी मेरी कहानी' हे गाणं  रानूच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आले आहे. या गाण्यानंतर रानू मंडलसोबत काम करण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत. यामध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानूचाही समावेश आहे.

Web Title: Video:Internet sensation Ranu Mondal shows anger over fan who went to take selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.