VIDEO: While enjoying Shilpa Shetty's appearance in the swimming pool, fans said - 'Yoga in the pool' | VIDEO : शिल्पा शेट्टी स्विमिंग पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, चाहते म्हणाले - 'योगा इन द पूल'

VIDEO : शिल्पा शेट्टी स्विमिंग पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, चाहते म्हणाले - 'योगा इन द पूल'

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. कधी डान्स व्हिडीओ तर कधी फिटनेस व्हिडीओच्या माध्यमातून चर्चेत येत असते. शिल्पा शेट्टीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे. यावेळी ती योग मुद्रा करताना दिसते आहे. शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ तिच्या टीमने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. तसेच या व्हिडीओवर चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावला आहे. या व्हिडीओत शिल्पा शेट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. बऱ्याचदा तिचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. 


शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती निकम्मा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि गायिका शर्ले सेतिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरीसोबत हंगामा २मध्ये दिसणार आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर शिल्पा शेट्टी रुपेरी पडद्यावर कमबॅक करते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIDEO: While enjoying Shilpa Shetty's appearance in the swimming pool, fans said - 'Yoga in the pool'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.