VIDEO: What will be the name of Saif Ali Khan and Kareena Kapoor's second baby ?, the actress revealed | VIDEO: काय असणार सैफ अली खान आणि करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचं नाव?, अभिनेत्रीने केला खुलासा

VIDEO: काय असणार सैफ अली खान आणि करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचं नाव?, अभिनेत्रीने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खानने पुन्हा आई बाबा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी चाहत्यांना सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या बाळाचे नाव काय ठेवणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. करीना कपूर खानने याबाबत एका शोमध्ये खुलासा केला आहे.

नुकताच करीनाने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान नेहाने करीनाला तू प्रेग्नेंट असल्याचे समजताच तुझ्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारापैकी कोणी तुला बाळासाठी नाव सुचवले आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर करीनाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘तुला खरे सांगू का? तैमूरच्या वेळी त्याच्या नावावरुन जे वाद झाले होता ते पाहून मी आणि सैफने अद्याप बाळाचे नाव ठरवलेले नाही. आम्ही नावाचा विचार नंतर करु आणि तुम्हा सर्वांना सरप्राइज देऊ’ असे करीना म्हणाली.

करीना आणि सैफने एक सोशल मीडियावर ऑगस्ट महिन्यात ते दोघे पुन्हा आई-बाबा होत असल्याचे सांगितले होते. “आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असे सैफ व करीनाने म्हटले होते.

२०१२ साली ऑक्टोबरमध्ये सैफ-करीनाने लग्न केले. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. आता तैमुर तीन वर्षांचा असून तो फोटो आणि क्युटनेसमुळे चर्चेत असतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIDEO: What will be the name of Saif Ali Khan and Kareena Kapoor's second baby ?, the actress revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.