VIDEO: Video of Salman Khan's patriotic song goes viral on social media | VIDEO: सलमान खानच्या देशभक्तीपर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

VIDEO: सलमान खानच्या देशभक्तीपर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

बॉलिवूडचा दबंग खान सलमान स्वातंत्र्य दिनानिमित्त नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला घेऊन आला आहे. देशभक्तीपर गीत खुद्द त्यानेच गायले आहे. त्याने या गाण्याच्या माध्यमातून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी देखील सलमान खानने गायलेल्या ‘प्यार करोना’ आणि ‘तेरे बिना’ या गाण्यांतून सर्वांचंच लक्ष वेधून घेतले होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीत सारे जहां से अच्छा से हिंदुस्तां हमारा हे प्रसिद्ध गाणे सलमानने त्याच्या शैलीत गायले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन अतुल अग्निहोत्री याने केले आहे. त्याने या गाण्याची एक झलक चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या गाण्याच्या माध्यमातून सलमानने आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.


मीडिया रिपोर्टनुसार लॉकडाऊननंतर 'सलमान राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. किक 2014 ला रिलीज झाला होता.या चित्रपटाच्या माध्यमातून साजिदने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. या चित्रपटात सलमान आणि जॅकलिनच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

त्यानंतर आता किक 2ची घोषणा करण्यात आली आहे. यात पुन्हा एकदा सलमान व जॅकलीन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIDEO: Video of Salman Khan's patriotic song goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.