VIDEO: Riteish Deshmukh, overwhelmed by the action of a woman helping a disabled person, shared video | VIDEO: दिव्यांग व्यक्तीला मदत करणाऱ्या महिलेची कृती पाहून भारावला रितेश देशमुख, शेअर केला व्हिडिओ

VIDEO: दिव्यांग व्यक्तीला मदत करणाऱ्या महिलेची कृती पाहून भारावला रितेश देशमुख, शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले मत, फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. बऱ्याचदा तो फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेतही येत असतो. नुकतेच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ एका महिलेचा आहे जी दिव्यांग व्यक्तीला मदत करताना दिसते आहे. या महिलेची कृती पाहून रितेश खूपच भारावून गेला.

रितेशने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, 'आपणही या महिलेसारखेच मदत करायला शिकले पाहिजे. तेही आपल्याला कोणी पहात नसतानादेखील.' रितेशने या महिलेचं कौतुक केले आहे. रितेशने हा व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना या महिलेसारखे कोणताही स्वार्थ न बाळगता माणूसकीच्या नात्याने दुसऱ्यांना मदत केली पाहिजे असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

रितेशचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटचा बागी 3 चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याच्या सोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIDEO: Riteish Deshmukh, overwhelmed by the action of a woman helping a disabled person, shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.