Very hard work to do huga pooja for upcoming movie | आगामी चित्रपटासाठी पूजा हेगडे करतेय खूप मेहनत
आगामी चित्रपटासाठी पूजा हेगडे करतेय खूप मेहनत

ठळक मुद्देपूजा हेगडे दोन वर्षानंतर करते आहे बॉलिवूडमध्ये कमबॅक 'हाऊसफुल 4' चित्रपटातील एका गाण्यावर थिरकणार पूजा पाच तास करतेय जिममध्ये वर्कआऊट

'मोहेजोंदाडो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा हेगडे दोन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे. 'हाऊसफुल 4'मध्ये ती झळकणार आहे. या चित्रपटासाठी सध्या ती खूप मेहनत करते आहे. जिममध्ये जाऊन वर्कआऊट केल्यानंतर ती सिनेमातील गाण्याची दिवसभर रिहर्सल करते आहे. 


पूजाला माहित आहे की यावेळी तिला जास्त मेहनत करावी लागणार आहे. कारण बॉलिवूडमधील दुसऱ्या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या तिच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. त्यामुळे तिला कोणतीही कसर ठेवायची नाही. म्हणून सध्या ती फिटनेससाठी पाच तास जिममध्ये वर्कआऊट करते आहे. 'हाऊसफुल 4' चित्रपटात ती एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहे आणि सध्या ती या गाण्यावरील स्टेप्सची खूप रिहर्सल करते आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी ती लंडनला रवाना होणार आहे. या गाण्याची कोरियोग्राफी फराह खान करते आहे. 
पूजा हेगडे म्हणाली की, 'या गाण्यासाठी चपळतेची गरज असून त्यासाठी मला एरियल सिल्क व योगाचेही प्रशिक्षण घ्यावे लागले. फिटनेसला मी नेहमीच प्राधान्य देते. त्यामुळे हल्ली मी सकाळी वर्कआऊट करण्यासाठी चार वाजता उठते. तसेच हेल्दी फूड खाते. घरात बनलेले पदार्थ खाण्याला माझे प्राधान्य असते. माझा डायटिंगवर अजिबात विश्वास नाही. जंक फूड खाणे मी टाळते.' 
साजिद खान दिग्दर्शित 'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे.या चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात पूजा सह अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृति खरबंदा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

English summary :
Actor Pooja Hegde, who is making Bollywood debut in 'Mohejandado', makes Comeback in Bollywood after two years. She will be seen in 'Housefull 4'.


Web Title: Very hard work to do huga pooja for upcoming movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.