Varun dhawan will marry girlfriend natasha dalal on this day | लग्नाचा लेहंगा स्वत:च डिझाइन करणार वरुण धवनची दुल्हनिया, कारण...

लग्नाचा लेहंगा स्वत:च डिझाइन करणार वरुण धवनची दुल्हनिया, कारण...

 वरुण धवनच्या लग्नाची बातमी आतापर्यंत त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी वरुण आणि नताशाच्या लग्नात लग्न होणे अपेक्षित होते. परंतु . कोरोनामुळे लग्नाचे प्लॅनिंग पुढे ढकलले. रिपोर्टनुसार, या महिन्याच्या शेवटी हे कपल लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. वरुण आणि नताशाच्या कुटुंबातील लोक लग्नाच्या तयारीला लागली असल्याची बातमी येत आहे. लग्नाचे फंक्शन अतिशय खासगी ठेवले जाणार आहे. रिपोर्टनुसार 22 ते  26 फेब्रुवारी या पाच दिवस लग्नाचे फंक्शन अलीबागला चालणार आहे. ज्यात फक्त दोघांच्या कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत.  


नताशा तिच्या लग्नाचा लेहंगा डिझाइन करणार
वरुण धवनची होणारी पत्नी नताशा दलाल तिच्या लग्नासाठी स्वतःचा लेहंगा डिझाइन करणार आहे. वास्तविक नताशा दलाल स्वत: एक व्यावसायिक फॅशन डिझायनर आहेत. त्यामुळे नताशा लग्नात स्वत: चा लेहंगा स्वत:चा डिझाइन करण्याची शक्यता आहे.

वरूण धवन अलिबागमध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहे. यासाठी तो नुकताच तिथल्या फाइव्ह स्टार हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला गेला होता. हे एक ग्रॅण्ड पंजाबी वेडिंग असणार आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या लग्न सोहळ्याला खास पाहुण्यांना निमंत्रण दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. वरूण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अनेक सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्टीमध्ये अनेक वेळा दोघे एकत्र दिसतात.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun dhawan will marry girlfriend natasha dalal on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.