बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने 'स्टुडंट ऑफ द इअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याच चित्रपटातून आलिया भटनेही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटानंतर हे दोघे बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसले आणि त्यांची बॉन्डिंग ऑफ स्क्रीन खूप चांगली आहे. मात्र असे सांगितले जाते की वरूणची गर्लफ्रेंड म्हणजेच त्याची पत्नी नताशा दलालला त्या दोघांची जवळीक आवडत नव्हती. 

मीडिया रिपोर्टनुसार वरुण धवनची आलिया भटबरोबरची वाढती जवळीक नताशा दलालला अजिबात आवडत नव्हती. अगदी चित्रपटांमध्येही वरुण आणि आलियाचे किसिंग सीन पाहून तिला राग आला होता. दुसरीकडे, त्यावेळी आलिया भट सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत होती. तर सिद्धार्थही वरुण-आलियाची जवळीक पाहून इनसिक्योर झाला होता.


त्यानंतर, वरुण आणि आलियाच्या जवळीकीमुळे नताशा अस्वस्थ झाली होती. मग तिने शूटिंगवेळी वरुणला कंपनी द्यायला सुरुवात केली. जेणेकरून ती त्याच्यासोबत राहील आणि लक्षही ठेवता येईल.

सूत्रांच्या माहितीनुसार नताशाला सिनेइंडस्ट्रीची पार्श्वभूमी नसल्यामुळे सुरुवातीला तिला हे पचवणे जड जात होते. मात्र, हळूहळू तिला बॉलिवूडच्या वर्क कल्चरची सवय लागली आणि तिला समजले की आलिया-वरुणची बॉन्डिंग केवळ मैत्रीपुरती मर्यादित आहे.


 स्टुडंट ऑफ द इयर व्यतिरिक्त वरुण धवन आणि आलिया भटने बद्रीनाथ की दुल्हनिया, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, कलंक यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची सिनेमातील केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप भावते.


काही महिन्यांपूर्वी वरूण धवन आणि नताशाचे अलिबागमध्ये लग्न पार पडले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर आलिया भट सध्या रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun Dhawan was growing close to this actress, then his wife Natasha took this step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.