भारतातच नाही तर परदेशातही बॉलिवूड चित्रपटाचे चाहते आहेत. चित्रपटांसोबतच त्यांना गाण्याचेही क्रेझ असल्याचं बऱ्याचदा पहायला मिळतं. त्यामुळे चित्रपट पाहण्यासोबत अनेक परदेशी लोक किंवा सेलिब्रेटी बॉलिवूड डान्स शिकण्यासाठी उत्सुक असतात. अशीच एक बॉलिवूडची खूप मोठी चाहती आहे. ही व्यक्ती म्हणजे वर्ल्‍ड रेसलिंग एण्टरटेनमेंट (WWE)मधील चॅरलोट फ्लेअर. काही दिवसांपूर्वीच ती भारतात आली होती. त्यावेळचा एक व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत बॉलिवूड अभिनेता वरुण धवन चॅरलोटला डान्स शिकवताना दिसतो आहे.

WWE ची महिला रेसलर चॅरलोट फ्लेअर काही दिवसांपूर्वी WWE आवडणाऱ्या तरुण-तरुणींसोबत बालदिन साजरा करण्यासाठी भारतात आली होती. दरम्यान तिला भेटण्यासाठी तिच्या चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. त्यावेळी तिनं बॉलिवूड स्टार अभिनेता वरुण धवनकडून बॉलिवूड डान्सच्या काही स्टेप्ससुद्धा शिकण्याचा प्रयत्न केला. याचाच एक व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.


याशिवाय भारत भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने लिहिलं की, मी भारताच्या प्रेमात पडले आहे. मला इथे आल्यावर एका कुटुंबाप्रमाणे वाटलं. या ठिकाणी साजरे केले जाणारे सण उत्सव आणि इथल्या लोकांची उदारता मला खूप भावली. माझी भारत भेट स्पेशल बनवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. इथले पदार्थ, बॉलिवूड डान्स आणि साडी या सर्वच गोष्टी नेहमीच माझ्या स्मरणात कायम राहतील.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun Dhawan teaches WWE Wrestler Bollywood Dance, video is viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.