वरूण धवन आणि नताशा दलालचे अफेअर कोणापासून लपून राहिलेले नाही. दोघे याच वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती आहे. फिल्मी बिटच्या रिपोर्टनुसार 2020मध्ये लग्नाचा मूहुर्त काढला असल्याची माहिती आहे. 22 मे 2020 ला वरुण आणि नताशा लग्न करणार आहे. या ग्रँड लग्नासाठी फक्त तारीखच नाही तर जागासुद्धा नक्की झाली आहे. अजूनपर्यंत वरुण किंवा नताशाच्या कुटुंबीयांकडून यावर मोहर लावण्यात आलेली नाही. 


रिपोर्टनुसार 22 मे 2020मध्ये दोघे थायलंडमध्ये लग्न करु शकतात. मात्र कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे दोघे लग्नाचे ठिकाण बदलू शकतात. नताशा आणि वरुणच्या लग्नात करण जोहर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ऐवढेच नाही तर नताशा लग्नात करण जोहरच्या ज्वेलरी ब्रँडचे दागिने परिधान करणार आहे. हे एक ग्रँड लग्न असणार आहे,जे आठवडाभर चालणार आहे. यात मेहंदी, संगीत आणि रिसेप्शनचा समावेश आहे. वरुणच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, करण जोहर, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि सलमान खान यासारख्या अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वरुण आणि नताशा लहानपणासूनच मित्र आहेत. दोघांनी शिक्षणसुद्धा एकत्र पूर्ण केले आहे. 


वर्कफ्रंटबाबात बोलायचे झाले तर वरूणचा 'कुली नंबर १' १ मे, २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.गोविंदा व करिश्मा कपूर यांचा कुली नंबर १ चित्रपटाचा हा रिमेक आहे. यात या दोघांची जागा वरूण धवन व सारा अली खानने घेतली आहे.

Web Title: Varun dhawan natasha dalal wedding marriage date may 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.