Varun dhawan natasha dalal may go to turkey for honeymoon aamir khan controversy related to the place | हनीमूनसाठी वरुण-नताशा तुर्कीला जाणार? आमिर खानच्या जाण्यावरून झाला होता गदारोळ

हनीमूनसाठी वरुण-नताशा तुर्कीला जाणार? आमिर खानच्या जाण्यावरून झाला होता गदारोळ

अलीकडेच वरुण धवन आणि नताशा दलालचे लग्न झाले. कोरोनामुळे हे लग्न मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती पार पडले. आता इतर कपल्सप्रमाणे   वरुण-नताशाच्या हनिमूनबद्दलही बरेचसे अंदाज बांधले जात आहेत.

हनीमूनवर जाण्याचा प्लान नव्हता
आत्तापर्यंत या कपलकडून याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही पण वरुण आणि नताशा हनीमूनसाठी तुर्कीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की कामाच्या कमिटमेंट्समुळे वरुण लग्नानंतर हनीमून जाऊ नाही शकत. 

कपलचे बदलला मूड
 नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार कपला मूड बदला आहे. ते तुर्कीच्या इस्तंबूलमधील सुंदर आणि  लक्झरी शीरेन पॅलेसमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंट करणार आहेत. समुद्र किनारी असलेले हे हॉटेल सुंदर आणि उत्कृष्ट लक्झरीसाठी जगभर प्रसिद्ध आहे.


अनेकांनी साधला होता आमिरवर निशाणा
जगभरातून शीरॉन पॅलेसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी लोक येत असतात पण बॉलिवूड सुपरस्टार्स तुर्कीला पोहोल्यामुळे देशात बराच गदारोळ झाला होता. आमिर गेल्या वर्षी आपल्या 'लालसिंग चड्ढा' या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी तुर्कीला गेला होता. तिथे त्याने फर्स्ट लेडी राष्ट्रपती  अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन यांची पत्नी एमीन एर्दोगन यांची भेट घेतली होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आमिर भारतातील बर्‍याच लोकांच्या निशाण्यावर आला होता. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun dhawan natasha dalal may go to turkey for honeymoon aamir khan controversy related to the place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.