बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. असे म्हटले जाते की त्याच्या लग्नाचे ई-आमंत्रण कुटुंब आणि जवळच्या लोकांना पाठविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की वरुण धवनने अलिबागमध्ये 200 लोकांसाठी हॉटेल बुक केले आहे. हे पंजाबी लग्न असेल. असेही म्हटले जात आहे की 24 जानेवारीला हे दोघे गाठ बांधतील. 22-25 जानेवारी दरम्यान लग्नाच्या विधी होतील. 

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार वरुणचा जवळचा नातेवाईकांचे म्हणणे आहे की, आम्हाला ई-आमंत्रणे मिळाली आहेत. आता आपल्याला वरुणच्या लग्नासाठी अलिबागच्या दिशेने जाणारे अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटी लवकरच दिसतील. डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवनचं लग्न धुमधडाक्यात होणार आहे. 

 बॉम्बे टाईम्सशी बोलताना वरुणचे काका अनिल धवन म्हणाले, 'व्वा, मी सरप्राईज्ड आहे.' या महिन्यात दोघांचे लग्न होणार आहे? आणि आम्हाला माहित नाही. तो शेवटच्या क्षणी आम्हाला आमंत्रित करेल?

अनिल धवन म्हणतात, "या गोष्टी मी बर्‍याच काळापासून ऐकतो आहे. गेल्या वर्षी असे म्हटले होते की दोघे मेमध्ये लग्न करणार आहेत. काहीही असो, आमचे सर्व कुटुंब सदस्य त्यांना लग्न करण्यास सांगत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun dhawan natasha dalal getting married on 24 january uncle anil dhawan reveals the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.