ठळक मुद्देवरूणने अलीकडे ‘भेडिया’ या सिनेमाचे शूटींग पूर्ण केले आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या सिनेमात वरूणसोबत क्रिती सॅनन फिमेल लीड साकारताना दिसणार आहे. 

देशात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना अशात स्वत:च्या बर्थ डेचे एक ग्राफिक्स सोशल मीडियावर शेअर करणे वरूण धवनला (Varun Dhawan)  चांगलेच महागात पडले. यामुळे वरूण जबरदस्त ट्रोल झाला.
तर येत्या 24 एप्रिलला वरूणचा बर्थ डे आहे. वरूणच्या येणा-या वाढदिवसाची भेट म्हणून एका चाहत्याने त्याचे हे ग्राफिक्स तयार केले. या ग्राफिक्समध्ये वरूण वेगवेगळ्या फिल्मी अवतारात दिसतोय आणि ग्राफिक्सखाली ‘प्लाज्मा डोनेट करा, आयुष्य वाचवा,’ असा मॅसेज लिहिलेला आहे. (varun dhawan brutally trolled)

तसे बघता, या ग्राफिक्समध्ये काहीही चुकीचे नाही. चुकीचे आहे तो टायमिंग. होय, सोशल नेटवर्क टाइमलाईन्स ऑक्सिजन, औषधं, हॉस्पिटल बेड्स सारख्या गोष्टींच्या मदतीची याचना करणा-या मॅसेजनी भरून वाहत असताना वरूणने हे ग्राफिक्स पोस्ट केले़ म्हणजे काय तर, परिस्थिती काय अन् वरूणने केले भलतेच? असे काहीसे झाले.

नेटक-यांनी केले ट्रोल
वरूणने हे ग्राफिक्स पोस्ट करताच अनेक युजर्सनी त्याला ट्रोल करणे सुरु केले. इतका बालिशपणा वरूण सारखा अभिनेता कसा करू शकतो? असा सवाल एका युजरने केला. ओह, वरूण तुला मी समजूतदार समजत होतो, असे एका युजरने लिहिले. वरूणने या चाहत्याला उत्तरही दिले. 

त्याने लिहिले, ‘हे ग्राफिक्स ज्याने बनवले, त्याला खूश करण्याचा प्रयत्न होता. मी हे शेअर करावे, अशी विनंती त्याने केली होती. मात्र सध्या हे मीडियम त्यासाठी वापरायला नको होते,’ असे लिहित वरूणने ग्राफिक्सची पोस्ट डिलीट केली.
वरूणने अलीकडे ‘भेडिया’ या सिनेमाचे शूटींग पूर्ण केले आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या सिनेमात वरूणसोबत क्रिती सॅनन फिमेल लीड साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचे शूटींग अरूणाचल प्रदेशातील जीरो येथे झाले. याठिकाणी कोरोनाची एकही केस नाही, असा दावा केला जातोय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun Dhawan deletes birthday DP after getting trolled online for being insensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.