अभिनेत्री कियारा आडवाणी पुन्हा एकदा गुड न्यूज चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहतासोबत 'जुग जुग जियो' चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात ती वरूण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

नुकतेच या चित्रपटाबद्दल बोलताना कियारा आडवाणीने सांगितले की, नोट्स एक्सचेंज करण्यासाठी वरूण धवन तिला मध्यरात्री फोन करत होता. जेणेकरून सीन्स परफेक्ट व्हावेत. कियाराच्या नुसार, आपल्या कामाप्रती वरूण धवनची निष्ठा पाहून ती हैराण झाली. 


कियारा आडवाणीने पुढे सांगितले की, इतकेच नाही तर अनिल कपूरचा उत्साहदेखील वरूण धवनशी मिळताजुळता आहे. मला कामा प्रती निष्ठा असलेल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे स्वतःला नशीबवान समजते. ते पेपरवर एनर्जी घेऊ शकतात आणि स्क्रीनवर मल्टीप्लाय करू शकतात.


चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्यानंतर टीमला अडचणीचा सामना करावा लागला होता. दिग्दर्शकासोबत वरूण धवन आणि नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती. आता कलाकार कोरोना मुक्त झाले असून त्यांनी शूटिंगला सुरूवात केली आहे.


जुग जुग जियो चित्रपटाशिवाय कियारा शेरशाह चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. इतकेच नाही तर ती अनीस बझ्मीच्या भूल भुलैया २ मध्ये दिसणार आहे. यात कियारासोबत कार्तिक आर्यन आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun Dhawan calls Kiara Advani for this in the middle of the night, the actress revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.