अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. बी-टाऊनमधले 2021 चे हे पहिले लग्न आहे आणि प्रत्येकाच्या नजरावर यावर लागल्या आहेत.  23 जानेवारीला वरूण व नताशाची हळद व मेहंदी सेरेमनी आहे. यानंतर 24 जानेवारीला हिंदू पद्धतीने दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. या विवाहाबद्दल सुरक्षेची सर्व  व्यवस्था केली आहे जेणेकरून त्यांच्या प्रायव्हसीत कोणीही हस्तक्षेप होऊ नये. वेडिंग वेन्यूभावती  मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच अनेक सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावण्यात आले आहेत.


वरुण धवन आणि नताशा दलालचा वेडिंग वेन्यू फ्लेक्स बोर्डने झाकलेले आहे. लग्नाच्या वेळी कोणी बाहेरुन फोटो क्लिक करू नये. त्याचवेळी अभिनेताचे वडील डेव्हिड धवन, आई लाली धवन, भाऊ रोहित धवन आणि वहिनी जान्हवी धवन हे अलिबागच्या द मेन्शन हाऊसमध्ये पोहोचले आहेत. वरूण व नताशाचा लग्नसोहळा अतिशय खासगी असणार आहे.

अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. रिपोर्टनुसार या लग्नाला सलमान खान, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, आलिया भट, साजिद नाडियाडवाला आणि शाहरुख खान सामील होणार आहेत.

 मेन्शन हाऊस सुमारे १ एकर जागेत पसरले आहे. या अलिशान रिसॉर्टमध्ये 25 खोल्या, स्विमींग पुल, सीक्रेट गार्डन, रेस्टारंट,स्पा, पूल साईड कबाना अशा सगळ्या सुविधा आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Varun dhawan and natasha dalal wedding tight security cover and additional cctv cameras seen at wedding venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.