वरीना हुसैन आता दाक्षिणात्य सिनेमात घालणार धुमाकूळ, यांच्यासोबत करतेय पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:12 PM2021-01-26T12:12:31+5:302021-01-26T12:12:52+5:30

बॉलिवूड अभिनेत्री वरीना हुसैन आगामी चित्रपट द इन्कम्प्लीट मॅनचे शूटिंग गोव्यात करते आहे

Varina Hussain will now make her debut in southern cinema with Dhumakul | वरीना हुसैन आता दाक्षिणात्य सिनेमात घालणार धुमाकूळ, यांच्यासोबत करतेय पदार्पण

वरीना हुसैन आता दाक्षिणात्य सिनेमात घालणार धुमाकूळ, यांच्यासोबत करतेय पदार्पण

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री वरीना हुसैन आगामी चित्रपट द इन्कम्प्लीट मॅनचे शूटिंग गोव्यात करते आहे. त्यामुळे सध्या ती खूप व्यग्र आहे. यासोबतच ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे, सूत्रांच्या माहितीनुसार, वरीना हुसैन लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच तिने साउथच्या मोठ्या प्रोडक्शन हाउस एनटीआर प्रोडक्शनसोबत एका बिग बजेट चित्रपटाला होकार दिला आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता वरीना हुसैन दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. वरीनाने हा प्रोजेक्‍ट साइन केला आहे. साउथ इंडस्टीमधील एक प्रसिद्ध प्रोडक्‍शन हाउसद्वारा निर्मित चित्रपटात ती एका वेगळया भूमिकेत दिसणार आहे. हा एक तेलुगू चित्रपट असून यात वरिना मुख्य भूमिका साकारत आहे.


या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी वरिना पुढील महिन्यात हैदराबादला जाणार आहे. सध्या ती गोवा येथे शारिब हाश्‍मी आणि फ्रेडी दारूवाला यांच्यासोबत आपल्य आगामी 'द इन्कम्प्लीट मॅन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोव्यातील शेड्यूल संपल्यानंतर ती साउथ चित्रपटाचे शूटिंगसाठी हैदराबादला जाणार आहे.

 वरीना हुसैनने २०१८ साली लवयात्री चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानच्या बॅनरखाली करण्यात आली होती. याच चित्रपटातून आयुष शर्मानेदेखील बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर वरीना 'दबंग ३'मधील 'मुन्ना बदनाम हुआ' या डान्स आयटम साँगमध्ये झळकली होती.

Web Title: Varina Hussain will now make her debut in southern cinema with Dhumakul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.