वाणी कपूरने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली आहे. 'शुद्ध देसी रोमांस' सिनेमातून तिने बॉलिवू़डमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ती बेफिक्रे सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसली होती. वाणी नुकतीच ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबतवॉर या अॅक्शन सिनेमात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात वाणीची भूमिका छोटीशी असली तरीदेखील तिने या चित्रपटातील भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली. 

वाणी कपूर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या नव्या प्रोजेक्टची अपडेट देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे. 

वाणी कपूर नुकतीच स्ट्रीक्स प्रोफेशनलची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर झाली आहे.

याबाबत ती म्हणाली की, रंग आणि स्टायलिंगच्या माध्यमातून मी माझ्या केसांवर नेहमीच प्रयोग करत असते, त्यामुळे हा अनुभवही माझ्यासाठी खूप छान असणार आहे.

वाणी कपूर वॉर या चित्रपटानंतर आता समशेरा चित्रपटात झळकताना दिसणार आहे.

या चित्रपटाबद्दल तिने सांगितले की, 'समशेरा' हा एक पीरिएड ड्रामा सिनेमा आहे. मी यात एक वेगळ्या प्रकराची भूमिका साकारते आहे जी मी आतापर्यंत कधीच केलेली नाही.

वाणीने पुढे म्हणाली की, 'समशेरा'च्या माध्यमातून मी पहिल्यांदाच दिग्दर्शक करण मल्होत्रा आणि रणबीर कपूरसोबत काम करते आहे. कारण सिनेमात आपल्याला काय काय हवं याबाबत खूप ठाम असतो. 

Web Title: Vani Kapoor photoshoot, looks glamorous and in bold look after the success of 'War'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.