ठळक मुद्देकाही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती.

आज व्हॅलेन्टाईन डे. जगभर व्हॅलेन्टाईन डे साजरा होत असताना बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स हा दिवस कसा विसरणार? बॉलिवूडची सुंदरी सुश्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल यांनी खास अंदाजात व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. रोहमनसोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो सुश्मिताने शेअर केलेत.
सुश्मिताने रोहमन व आपल्या दोन मुलींसोबत केक कापून व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. माझे चाहते, बॉयफ्रेन्ड रोहमन व माझ्या दोन्ही मुलींना व्हॅलेन्टाईन डेच्या शुभेच्छा, असे हे फोटो शेअर करताना सुशने लिहिले आहे. रोहमन व सुशचे हे रोमॅन्टिक फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.

काही महिन्याआधी सुश्मिता आणि रोहमनने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली केली होती. सुश्मिता सेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते. 

अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी
रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. होय, रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला.

 

या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती. कारण सुश्मिता कधीच आपल्या इन्स्टा हँडलवरचा डीएम अर्थात डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन कधी ओपन करत नव्हती.( हा ऑप्शन ओपन केल्यावर मॅसेज पाठवणा-यास ‘वेलकम इन माय पर्सनल स्पेस’ अशा आशयाचा मॅसेज जातो.) एकदिवस सुश्मिता आपल्या मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक चुकून तिच्या हातून डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन ओपन झाले आणि रोहमनचा मॅसेज तिला मिळाला. रोहमनचा हा मॅसेज सुश्मिताला इतका आवडला की, तिने लगेच त्यावर रिप्लाय केला. सुश्मिताचा रिप्लाय आलेला पाहून रोहमनचे काय व्हावे? त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मग काय मॅसेजचा हा ‘सिलसिला’ सुरु झाला. यानंतर   रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली. आता तर हे नाते बरेच पुढे गेले आहे.

Web Title: valentines day 2020 sushmita sen shares romantic photo with rohman shawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.