बॉलिवूडची बेफिक्रे गर्ल म्हणजेच अभिनेत्री वाणी कपूर हिने बिकनी परिधान करण्यास नकार दिला आहे. तिने कोणत्याही जाहिरातीत बिकनीत शूट करणार नसल्याचं सांगितलं आहे. तिला नुकतेच एका स्किन केअर ब्रॅण्डने त्यांच्या जाहिरातीसाठी संपर्क केला होता. मात्र तिने या जाहिरातीत काम करण्यास नकार दिला कारण ही जाहिरात बिकनीमध्ये शूट करायची होती. वाणी चित्रपटात बिकनीमध्ये झळकली आहे. मात्र जाहिरातीत बिकनी परिधान करण्यास नकार का दिला, याचा खुलासाही तिने केला आहे.  


मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, एका मोठ्या कंपनीकडून वाणीला ही ऑफर मिळाली होती. मात्र जाहिरातीच्या दिग्दर्शकांच्या मते, जाहिरातीत बिकिनी घालणं गरजेचं होतं. वाणीला जेव्हा ही गोष्ट सांगण्यात आली तेव्हा तिने बिकिनी घालायला स्पष्ट नकार दिला. 


टायगर श्रॉफ व हृतिक रोशन यांच्या वॉर चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये वाणी कपूर बिकनीमध्ये दिसली आहे. तसेच तिने बेफिक्रे चित्रपटात काही सीनमध्ये बिकनी घातलेली दिसली आहे. या सिनेमात रणवीर सिंगसोबत बोल्ड सीनदेखील दिले आहेत. याचादेखील तिने खुलासा केला आहे.


वाणीच्या मते जाहिरातीत बिकनी घालणं योग्य नाही. तिचं म्हणणं आहे की, कोणत्याही चित्रपटांपेक्षा जाहिरातीतून जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. तसेच ती जाहिरात पुढे अनेक वर्ष वापरली जाते. अशात जर बिकिनी घालून जाहिरात केली तर इमेजला त्रास होऊ शकतो.


वाणी पुढे सांगते की, आता कुठे करियर सुरू झालं आहे. आताच जर एखाद्या इमेजमध्ये अडकली तर करियरला नुकसान होऊ शकतं.


Web Title: vaani kapoor refused to wore bikini in advertisement actress give the reason behind it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.