User Asks Bhai Mannat Bechne Wale Ho kya From Shahrukh khan in ask SRK Session Actor Reply Will Win Your Heart | 'भाई अपना बंगला Mannat बेचने वाले हो क्या?' प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

'भाई अपना बंगला Mannat बेचने वाले हो क्या?' प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

रोमान्सचा बादशाह आणि बॉलीवुडचा किंग शाहरुख खानचे कित्येक फॅन्स आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात शाहरुखचे फॅन्स पसरलेत. त्याच्या प्रत्येक फॅन्सची काही ना काही खास बात आहे.सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. किंग खान शाहरुखचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. एका अशाच चाहत्याने शाहरुखकडे थेट त्याचा बंगला विकणार का? असाच सवाल केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर युजर्स काय विचारतील याचा अजिबात नेम नाही हेच पुन्हा एकदा समोर आले आहे. 

युजर्सने विचारलेल्या या प्रश्नावर शाहरुखनेही भन्नाट उत्तर दिले आहे. शाहरुख़ने इमोशनल अंदाजात उत्तर देत म्हटले की,‘भाई मन्नत बिकती नहीं, सर झुका कर मांगी जाती है. याद रखोगे तो लाइफ में कुछ पा सकोगे. शाहरुखचे हे उत्तर वाचून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. सध्या शाहरुखचा हा रिप्लाय सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तो फक्त ऑनस्क्रीनच बादशाह नाही तर ख-या आयुष्यातही बादशाह असल्याचे स्पष्ट होते अशाच प्रतिक्रीया सध्या त्याचे चाहते सोशल मीडियावर देत आहेत. शाहरुखच्या या उत्तराने त्याच्या या फॅनचं मन नक्कीच जिंकलं असेल.


'दीवाना', 'बाजीगर', 'डर', 'कभी हां कभी ना', 'करन अर्जुन', 'दिलवाले दुल्‍हनियां ले जाएंगे', 'चाहत', 'कोयला', 'यस बॉस', 'परदेस', 'दिल तो पागल है', 'दिल से', 'कुछ कुछ होता है', 'जोश, मोहब्‍बतें', 'कभी खुशी कभी गम', 'देवदास', 'कल हो न हो', 'मैं हूं ना', 'वीर जारा', 'डॉन', 'चक दे इंडिया', 'ओम शांति ओम' शाहरुखचे सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रसिकांची मनं जिंकली आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: User Asks Bhai Mannat Bechne Wale Ho kya From Shahrukh khan in ask SRK Session Actor Reply Will Win Your Heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.