ठळक मुद्देआयशा जुल्काने बीबीसीला सांगितलं होतं की, दिव्याच्या निधनानंतर एक खूप मोठी विचित्र गोष्ट घडली. काही महिन्यानंतर आम्ही रंग चित्रपटाचा ट्रायल पाहण्यासाठी फिल्मसिटीला गेलो होतो. दिव्या जशी स्क्रीनवर आली तशी स्क्रीन खाली पडली.

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. दिव्याचा उद्या वाढदिवस आहे. तिच्या कुटुंबियातील कोणाचाच या क्षेत्राशी संबंध नव्हता. पण खूपच कमी वयात तिने अभिनयक्षेत्रात प्रवास केला. तिने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकिर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ५ एप्रिल १९९३ रोजी जवळपास रात्री ११ वाजता अचानक दिव्या भारतीचे निधन झाले. 

दिव्या मुंबईतील वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडली. सकाळपर्यंत दिव्याच्या निधनाचे वृत्त सिनेइंडस्ट्रीत पसरलं. दोन दिवसानंतर दिव्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनानंतर असंख्य प्रश्न उभे ठाकले होते.

दिव्याच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी तिची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. दिव्याचे निधन झाले त्यावेळी ती काही चित्रपटाचं शूटिंग करत होती. काही सिनेमांचे शूटिंग अर्धे झाले होते. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग पुन्हा करावं लागलं. रंग चित्रपटात दिव्या भारतीसोबत आयशा जुल्काने काम केलं. आयशा जुल्काने बीबीसीला सांगितलं होतं की, दिव्याच्या निधनानंतर एक खूप मोठी विचित्र गोष्ट घडली. काही महिन्यानंतर आम्ही रंग चित्रपटाचा ट्रायल पाहण्यासाठी फिल्मसिटीला गेलो होतो. दिव्या जशी स्क्रीनवर आली तशी स्क्रीन खाली पडली. आम्हाला हे खूप विचित्र वाटलं.

आयशा जुल्काने पुढे मुलाखतीत सांगितले होते की, खूप वेळ विश्वासच बसला नाही. एक आणखीन विचित्र बाब आहे की कदाचित तिला काहीतरी माहित होते. ती नेहमी म्हणायची की, लवकर करा, लवकर चला, जीवन खूप छोटं आहे. तिने कधी स्पष्ट सांगितलं नाही मात्र कदाचित तिला तिच्या निधनाची चाहूल लागली होती. 

दिव्याच्या मृत्यूनंतर अनेक विचित्र किस्से समोर आले होते. खुद्द दिव्या भारतीच्या आईने सांगितले होते की, दिव्याच्या निधनानंतर दिव्या त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना उठवायची. जेव्हा त्याना लवकर उठायचे असायचे, त्यावेळी दिव्या स्वप्नात येत होती. इतकेच नाही तर दिव्या साजिद नाडियादवालाची दुसरी पत्नी वर्धाच्या स्वप्नात येत होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: uncertain things happened after divya bharati's demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.