बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता करण जोहरचा मुलगा यश जोहर आणि मुलगी रुही जोहरची नुकतीच बर्थ डे पार्टी पार पडली. ही पार्टी करण जोहरच्या घरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बॉलिवूडचे बरेच सेलिब्रेटी स्पॉट झाले होते. यात करीना कपूर, गौरी खान आणि राणी मुखर्जी यांच्यासारखे बरेच कलाकार हजर होते.

या पार्टीत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने. ते दोघे एकत्र एकाच गाडीतून करण जोहरच्या वांद्रे येथील घरी दाखल झाले होते. गाडीत बसलेले कियारा आणि सिद्धार्थ मीडियापासून नजर चुकवताना दिसले. 


तीन आठवड्यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे दोघे एकाच रेस्टॉरंटमध्ये लंच डेटला जाताना दिसले होते. त्यावेळी दोघे एकाच गाडीतून नाही तर वेगवेगळ्या गाडीने गेले होते. त्यानंतर कियारा उशीरा संध्याकाळपर्यंत सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी थांबली होती. तिथे मीडियाला पाहून ती खूप हैराण झाली होती.

तेव्हापासून तिच्या सिद्धार्थ सोबतच्या अफेयरच्या वृत्ताने जोर धरला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा करण जोहरच्या घरी एकत्र दोघे दिसल्यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसते आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच सिद्धार्थ आणि कियारा शेरशाह चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची भेट झाली आणि इथूनच ते दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. तर कियारा आडवाणी शेवटची इंदु की जवानी चित्रपटात झळकली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर आता ती जुग जुग जियो आणि भुलभुलैया २ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा महाराजा आणि थँक गॉडमध्ये झळकणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Two hearts are meeting ..! These new lovebirds of Bollywood reached Karan Johar's house in the same car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.