Two Bananas Cost Rahul Bose Rs 442 at Five-Star Hotel |  हॉटेलात ऑर्डर केलीत दोन केळी, बिल पाहून चक्रावला राहुल बोस

 हॉटेलात ऑर्डर केलीत दोन केळी, बिल पाहून चक्रावला राहुल बोस

ठळक मुद्देराहुलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

अलिशान हॉटेलातील मोठ-मोठ्या बिलांबद्दल आपण ऐकले आहेच. पण अभिनेता राहुल बोससोबत जे काही झाले ते वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील. होय, राहुल बोस एका 5 स्टार हॉटेलात मुक्कामाला आहे. या मुक्कामातील एक अनुभव राहुलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. होय, या हॉटेलात केवळ दोन केळी खाणे राहुलला चांगलेच महागात पडले.
  राहुलने हॉटेलमध्ये वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याने स्वत:साठी दोन केळी ऑर्डर केलीत. वेटर लगेच दोन केळी घेऊन आला. पण या दोन केळींचे बिल पाहून राहुलचे डोळे पांढरे झालेत. होय, राहुलने केवळ  दोन केळी खाल्ली.  या दोन केळींसाठी त्याला 442 रूपये मोजावे लागलेत. राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘माझ्या बोलण्यावर विश्वास बसण्यासाठी तुम्हाला हे पाहावे लागेल. फळे तुमच्या आयुष्यासाठी हानीकारक नाहीत, असे कोण म्हणेल? या हॉटेलला विचारा...,’ असे तो या व्हिडीओत म्हणतोय. 
राहुलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. शिवाय यानंतर लक्झरी हॉटेलातील मनमानी बिल वसूलीवर वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे. अनेक युजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तू शेक मागवले असते तर त्याचे बिल आयफोन इतके असते,’ असे एका युजरने गमतीत लिहिले आहे. ‘ राहुल, तू खाल्लेली केळी त्यांनी ऑस्ट्रेलियातून मागवली होती, म्हणून त्यांनी इतके बिल फाडले,’ असे एका युजरने लिहिले आहे.

तर अन्य एका युजरने हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल राहुलचे आभार मानले आहेत. ‘बरे झाले, तू हा व्हिडीओ शेअर केलास. किमान यामुळे कुठे जाऊ नये, हे तरी आम्हाला कळले,’ असे त्याने लिहिले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Two Bananas Cost Rahul Bose Rs 442 at Five-Star Hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.