twitter slams karthik aaryans pati patni aur woh trailer for marital rape joke | ‘पति पत्नी और वो’मधील ‘सेक्स’ डायलॉगने नेटक-यांची सटकली, वाचा सविस्तर
‘पति पत्नी और वो’मधील ‘सेक्स’ डायलॉगने नेटक-यांची सटकली, वाचा सविस्तर

ठळक मुद्दे‘पति पत्नी और वो’या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करत असून हा सिनेमा १९८७ साली याच नावाने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक आहे.

कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘पति पत्नी और वो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर लोकांना आवडला खरा. पण ट्रेलरमधील एका डायलॉगने मात्र नेटक-यांची सटकली. होय, ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन त्याचा मित्र अपारशक्ती खुराणासोबत वैवाहिक आयुष्यावर बोलताना दिसतोय. यादरम्यान कार्तिकच्या तोंडचा एक डायलॉग सध्या वादाचे कारण ठरला आहे. ‘बीवी से सेक्स मांग ले तो हम भिखारी. बीवी को सेक्स करने से मना कर दें तो हम अत्याचारी और किसी तरह जुगाड लगा के उससे सेक्स हासिल कर लें न तो बलात्कारी भी हम,’ हाच तो डायलॉग.


हा डायलॉग ऐकून अनेकांचे माथे फिरले. सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. ‘रेप जोक्स स्वीकार्य नाहीत, शेमफुल’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. अन्य एका युजरने कार्तिककडून अशी अपेक्षा नव्हती, असे लिहित आपली नाराजी व्यक्त केली. आता बॉलिवूड रेप जोक्सही करायला लागले का? अशी संतप्त प्रतिक्रिया एकाने दिली. 
‘पति पत्नी और वो’या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करत असून हा सिनेमा १९८७ साली याच नावाने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. ओरिजनल चित्रपटात संजीव कपूर, विद्या सिन्हा व रंजीता कौर मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाचा रिमेक ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा सोशल मीडिया युजरच्या काही प्रतिक्रिया...
 

 

Web Title: twitter slams karthik aaryans pati patni aur woh trailer for marital rape joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.