ठळक मुद्देमंदिराने 1999 मध्ये  निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. तिला 9 वर्षांचा मुलगा आहे.

आपल्या लेकीबद्दल लोक इतके वाईट बोलतील, असा विचारही मंदिरा बेदीने (Mandira Bedi) केला नसावा. मंदिरा सर्रास मुलगा वीर व मुलगी ताराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 2020 मध्ये मंदिराने ताराला (Mandira Bedi daughter Tara) दत्तक घेतले होते. अलीकडे आपल्या दोन्ही मुलांसोबत मज्जामस्ती करतानाचे काही फोटो मंदिराने इन्स्टास्टोरीवर शेअर केलेत आणि यानंतर काही युजर्सनी मंदिराच्या लेकीबद्दल अतिशय वाईट कमेंट्स करणे सुरु केले. (trolls call Mandira daughter street kid) 

मॅडम, तुम्ही कोणत्या स्लमडॉग सेंटरमधून आपल्या प्रॉप लेकीला दत्तक घेतले? अशा आशयाच्या चीड आणणा-या कमेंट्स युजर्सनी केल्यात. एका युजरने तर याहीपुढे जात कमेंट केली.

दत्तक घेतलेली ही मुलगी एकदम वेगळी पडलीये. तुम्ही नशेबाज लोभी लोक या झोपडपट्टीतील मुलीला कायम घाबरवत आहात, अशी कमेंट या युजरने केली. लेकीबद्दल अशा कमेंट वाचून कुठल्याही आईचा पारा चढेल. मंदिराही या कमेंट वाचून संतापली. मग काय, तिने या युजर्सला चांगलेच सुनावले.

अशा लोकांना अटेंशन हवे असते. तुला माझे अटेंशन मिळाले, असे मंदिराने एका युजरला फटकारताना लिहिले. अशाच अन्य एका युजरला उत्तर देताना तिने लिहिले, ‘मॉडल नागरिकही मागे नाहीत. तो स्वत:ला राजेश त्रिपाठी म्हणतोय. निश्चितपणे हे त्याचे खरे नाव नाही. कारण असे आजारी लोक सर्वात घाबरट असतात. नाव लपवून त्यांना केवळ जीभ चालवणे येते.’

मंदिराने 1999 मध्ये  निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. तिला 9 वर्षांचा मुलगा आहे. अलीकडे मंदिरा ‘साहो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. मंदिरा नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ब-याचदा तिला या फोटोंमुळे ट्रोलही केले आहे. मात्र या ट्रोलिंगचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. हेच कारण आहे की, तिने कधीच स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करणे सोडले नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: trolls mock mandira bedi daughter tara calling her street kid from slumdog centrer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.