Trolled: Serious allegation was made on the Mallaika Arrow! She gave it the answer !! | Trolled​ : मलायका अरोरावर केला गेला गंभीर आरोप! तिने असे दिले उत्तर!!
Trolled​ : मलायका अरोरावर केला गेला गंभीर आरोप! तिने असे दिले उत्तर!!
सोशल मीडियावर ट्रोलिंगचे बळी पडणे अर्थात नेटिजन्सच्या आक्षेपार्ह आणि नकारात्मक प्रतिक्रिया झेलणे बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवी बाब राहिलेली नाही. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या ना त्या कारणाने ट्रोलिंगचे बळी ठरले आहेत. या यादीत ताजे नाव आहे ते बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायका अरोरा हिचे. होय, मलायकाने आपला एक ताजा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडेल, अशी कदाचित मलायकाची अपेक्षा असावी. पण झाले भलतेच, या फोटोवरून मलायकाला ट्रोल व्हावे लागले. 
या फोटोत असे आक्षेपार्ह काय होते, तर मलायका यात शॉर्ट्समध्ये होती. काहींनी नाही म्हणायला मलायकाची प्रशंसा केली. तिच्या फोटोला लाईक केले. पण काहींनी मात्र या फोटोवरून मलायकाला ट्रोल करायला सुरुवात केली. ट्रोल करणाºयांनी मलायकाच्या पर्सनल लाईफवर कमेंट्स केलेत. एक्स हसबण्ड अरबाज खान याच्याकडून पोटगी रूपात मोठ्ठी रक्कम लाटण्याचा आरोप काहींनी तिच्यावर केला. एका नेटीजन्सने यालाच धरून कमेंट केली. ‘इसकी जिंदगी अब सिर्फ छोटे कपडे पहनना, जिम जाना और छुट्टियां मनाना रह गई है. क्या तुम्हें सच में कोई काम है? या पति से मिले पैसे पर ऐश कर रही हो?,’ असे या नेटिजन्सने लिहले. आता या कमेंट्सवर मलायकाचे भडकणे साहजिकच होते. तिनेही ही कमेंट लिहिणाºयाला चांगलेच फैलावर घेतले.‘मी खरे तर अशा कमेंट्सला उत्तरे देत नाही. कारण ते माझ्या सन्मानाविरूद्ध ठरते. पण येथे मला बोलावे लागतेय. कारण मला काही बोलण्यापूर्वी तू स्वत:कडे बघायला हवे. विशेषत:  माझ्याबद्दल काहीच ठाऊक नसताना, तू बसून नाहक मला फैलावर घेत आहेत. मी खरेचं तुला सांगेल की, स्वत:साठी लायकीचे काम शोध. तुझ्याकडे खरोखरच करण्यासारखे काहीही उरले नाहीय,असे मला वाटते’ अशा शब्दांत मलायकाने त्याला सुनावले. आता याचा त्या ट्रोल करणाºयावर काय परिणाम झाला, ते आम्हाला ठाऊक नाही.

ALSO READ : घटस्फोटानंतर मलाइका अरोरा झाली आणखी बोल्ड; शेअर केला टॉपलेस फोटो!

अरबाज व मलायका या दोघांचा विवाह १९९८ मध्ये झाला होता. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनीही परस्पर सामंजस्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले होते.
Web Title: Trolled: Serious allegation was made on the Mallaika Arrow! She gave it the answer !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.