Trending You Will Be Shocked To See Bhagyashree of 'Maine Pyaar Kiya' shared Bed Selfie | Trending: 'मैंने प्यार किया'च्या भाग्यश्रीने शेअर केला चक्क बेड सेल्फी, पाहून चाहते देतायेत अशा कमेंटस

Trending: 'मैंने प्यार किया'च्या भाग्यश्रीने शेअर केला चक्क बेड सेल्फी, पाहून चाहते देतायेत अशा कमेंटस


नव्वदीच्या दशकातला सुपरडुपर हिट सिनेमा 'मैने प्यार किया' मधील भाग्यश्री आजही चाहत्यांची तितकीच फेव्हरेट आहे.  'मैने प्यार किया' या सिनेमातून  झळकलेल्या भाग्यश्रीने सर्वांचीच मने जिंकली. 1989 साली ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला आणि सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमात भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली. सिनेमातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुकही झाले. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि ‘सुमन’च्या करिअरला ब्रेक लागला. विवाहबंधनात अडकल्यानंतर तिने तीन सिनेमा केलेत आणि यानंतर, अभिनयातून ब्रेक घेतला. 'मैने प्यार किया' रिलीजवेळी भाग्यश्री केवळ 19 वर्षाची होती.

भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच असतो.

रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या  फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. भाग्यश्री नुकताच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. भाग्यश्रीने बेडवर निवांत बसली असून पतीसोबत पोज देताना दिसत आहे.  भाग्यश्री या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. खूप सुंदर, परी अशा कमेंट्स भाग्यश्रीच्या फोटोवर तिच्या फॅन्सनी केल्या आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Trending You Will Be Shocked To See Bhagyashree of 'Maine Pyaar Kiya' shared Bed Selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.