The trailer of Priyanka Chopra Rajkummar Rao's Netflix film The White Tiger released |  जबरदस्त! रिलीज होताच ‘द व्हाईट टायगर’च्या प्रेमात पडले चाहते, पाहा ट्रेलर

 जबरदस्त! रिलीज होताच ‘द व्हाईट टायगर’च्या प्रेमात पडले चाहते, पाहा ट्रेलर

ठळक मुद्दे‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा नेटफ्लिक्ससोबतच चित्रपटगृहांमध्येही रिलीज होणार आहे.

ग्लोबल स्टार  प्रियंका चोप्रा लवकरच राजकुमार रावसोबत ‘द व्हाईट टायगर’या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. सोशल मीडियावर या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. 
 प्रियंकाने चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. ट्रेलरमध्ये राजकुमार व प्रियंका एनआरआय कपलच्या रूपात आहेत आणि आदर्श गौरव त्यांच्या ड्रायव्हरच्या भूमिकेत आहेत. प्रियंका व राजकुमार यांच्याशिवाय प्रत्येक सीनमध्ये आदर्श गौरवने धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे.
प्रियंकाने यात पिंकी नामक व्यक्तिरेखा साकारली आहे तर राजकुमारने अशोक नावाचे पात्र जिवंत केले आहे. आदर्श गौरव बलराम नामक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे.  ड्रायव्हर बलरामला श्रीमंत व्हायचे असते. आधी तो यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मात्र एका वळणावर लवकरात लवकर पैसा कमवण्याच्या नादात तो चुकीच्या मागार्ला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा वेगळ्या वळणावर जाते.

 

‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा नेटफ्लिक्ससोबतच चित्रपटगृहांमध्येही रिलीज होणार आहे. ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. रमिन बहरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या पहिल्याच कादंबरीसाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
नेटफ्लिक्स मुकूल देवरा यांच्यासोबत मिळून हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. प्रियंकाही एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून या सिनेमाशी जुळलेली आहे. गेल्यावर्षीच या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. शूटींगच्या अखेरच्या दिवसाचा फोटोही प्रियंकाने शेअर केला होता.

प्रियंका चोप्रा-राजकुमार रावच्या ‘द व्हाईट टायगर’ या सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात का?  

आदर्श गौरवसमोर प्रियंका-राजकुमारही फिके

ट्रेलरमध्ये आदर्श गौरवच्या अ‍ॅक्टिंगने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आदर्श गौरव हे नाव आधी तुम्ही ऐकले असते. शाहरूख खानचा ‘माय नेम इज खान’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर त्यातील छोटा शाहरूख तुम्हाला आठवत असेल. आदर्श गौरव यानेच ती भूमिका साकारली होती. गेल्या 10 वर्षांत आदर्श गौरवने आपल्या अ‍ॅक्टिंगवर प्रचंड कष्ट घेतलेत. द व्हाईट टायगरचा ट्रेलर पाहिल्यानंतर ते पदोपदी जाणवते. खरे सांगायचे तर या सिनेमात राजकुमार व प्रियंका नाही तर आदर्श गौरव मुख्य भूमिकेत  आहे. तोच या सिनेमाचा खरा हिरो आहे. याआधी मॉम, रूख या सिनेमात शिवाय लैला, हॉस्टल डेज या वेबसीरिजमध्ये तो दिसला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The trailer of Priyanka Chopra Rajkummar Rao's Netflix film The White Tiger released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.