ठळक मुद्देग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियंका चोप्रची ‘अनफिनिश्ड’ही बायोग्राफी नुकतीच प्रकाशित झाली.

‘ग्लोबल स्टार’ प्रियंका चोप्रा लवकरच राजकुमार रावसोबत ‘द व्हाईट टायगर’ या सिनेमात दिसणार आहे. आजच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आणि या फर्स्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा आहे. अशात आज प्रियंकाने या सिनेमाचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते क्रेझी झालेत.

प्रियंका व राजकुमार रावचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सनेही सिनेमाचे चार फोटो शेअर केलेत. यात प्रियंका, राजकुमार राव आदर्श गौरव दिसत आहेत. यापैकी एकाही फोटोत प्रियंका व राजकुमार एका फ्रेममध्ये नाहीत.

‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. रमिन बहरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या पहिल्याच कादंबरीसाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
नेटफ्लिक्स मुकूल देवरा यांच्यासोबत मिळून हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. य्प्रियंकाही एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून या सिनेमाशी जुळलेली आहे. गेल्यावर्षीच या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. शूटींगच्या अखेरच्या दिवसाचा फोटोही प्रियंकाने शेअर केला होता.

अशी आहे कथा
रिपोर्टनुसार, सिनेमात प्रियंका पिंकी मॅडमची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका गावात चहाच्या दुकानात काम करणारा तरूण एका मोठ्या शहरातील यशस्वी उद्योजक बनतो. मात्र या महत्त्वाकांक्षी तरूणाला याची मोठी किंमत चुकवावी लागते. हत्या, प्रेम, विश्वासघात असे अनेक पैलू या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

Unfinished...! प्रियंका चोप्राने ‘पोस्ट’ शेअर केली अन् ‘गुड न्यूज’ची चर्चा रंगली

१२ तासात नंबर वन ठरले ‘अनफिनिश्ड’
ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियंका चोप्रची ‘अनफिनिश्ड’ही बायोग्राफी नुकतीच प्रकाशित झाली. तिचे हे प्रकाशित झाले आणि केवळ १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरले. प्रियंकाने चोप्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचे पुस्तक बेस्ट सेलर ठरल्याची माहिती दिली होती.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: priyanka chopra and rajkkumar rao film the white tiger first look out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.