Time to apologize to Sanjay Leela Bhansali | अंकिता लोखंडेवर का आली संजय लीला भन्साळींची माफी मागण्याची वेळ

अंकिता लोखंडेवर का आली संजय लीला भन्साळींची माफी मागण्याची वेळ

सध्या आपल्या बॉलिवूडला घेऊन अंकिता लोखडे चर्चेत आहे. मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. एका मुलाखती दरम्यान अंकिता म्हणाली की, मी आशा करते की माझ्या चुकीसाठी  मला संजय लीला भन्साळी माफ करतील. आता तुम्ही विचार करत असाल अंकिता कोणत्या गोष्टीसाठी माफी मागते आहे. त्याचे झाले असे की अंकिताला संजय लीला भन्साळी यांनी पद्मावत चित्रपटात एक भूमिका ऑफर केली होता. मात्र या चित्रपटात काम करण्यास तिने नकार दिला. आता तिला तिने केलेल्या चुकीबाबत पश्चाताप होतो आहे.  

पुढे ती म्हणाली, संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यास नकार दिणे ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. अंकिताला तू काम न करण्यामागे काय कारण होते असे प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली त्यावेळी मी मेंटली मी काम करण्यासाठी तयार नव्हती. मला कामातून ब्रेक घ्यायला होता. अंकिता म्हणाली मी आशा करते संजय सर मला माफ करतील आणि दुसरी एखादी भूमिका ऑफर करतील.   

नुकताच अंकिताचा मणिकर्णिका चित्रपटातील लूक आऊट झाला आहे. यात अंकिता महाराष्ट्रीय नऊवारीत अतिशय सुंदर दिसतेय. यात राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका कंगना राणौत साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. 3 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’मध्ये अंकिता  झलकारी बाईची भूमिका साकारताना दिसणार आहे.  सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपले शौर्य आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते.   इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. 

ALSO READ :  ​वैभव तत्ववादी आणि अंकिता लोखंडे यांच्यातील मैत्री बहरतेय

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Time to apologize to Sanjay Leela Bhansali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.