TikTok star Sandhya Chauhan commits suicide | सिया कक्करनंतर आणखी एका टिक टॉक स्टारची आत्महत्या, डिप्रेशन बनले मृत्यूचे कारण

सिया कक्करनंतर आणखी एका टिक टॉक स्टारची आत्महत्या, डिप्रेशन बनले मृत्यूचे कारण

ठळक मुद्देगत 26 जूनला सिया कक्कर या टिक टॉक स्टारने गळफास लावून आत्महत्या केली होती. ती सुद्धा डिप्रेशनची बळी ठरली, असे मानले जात आहे.  

कथितरित्या डिप्रेशनमुळे आणखी एका टिक टॉक स्टारने आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी टिक टॉक स्टार सिया कक्करने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली होती. आता टिक टॉक स्टार संध्या चौहान हिने आत्महत्या केली.
दिल्लीच्या ग्रीन पार्क कॉलनीत राहणारी संध्या दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी होती. केवळ वयाच्या 18 वर्षी तिने आत्महत्या केली. पोलिसांनी कुठलीही सुसाइड नोट न सापडल्याने संध्याने इतके टोकाचे पाऊल का उचलावे, असा प्रश्न पडला आहे.

तूर्तास संध्याने डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून ती डिप्रेशनमध्ये होती. टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वप्रथम तिच्या कझिनने तिचा मृतदेह पाहिला. यानंतर लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. 
चर्चा खरी मानाल तर टिक टॉक बंद झाल्याने संध्या अस्वस्थ होती. काही दिवसांपूर्वीच सरकारने टिकटॉकसह 59 चीनी अ‍ॅप्स बंद केल्यात. भारत-चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गत 26 जूनला सिया कक्कर या टिक टॉक स्टारने गळफास लावून आत्महत्या केली होती. ती सुद्धा डिप्रेशनची बळी ठरली, असे मानले जात आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: TikTok star Sandhya Chauhan commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.