ठळक मुद्दे. 25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसत असते.

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, हेच सगळे मानून चालले होते. अगदी दिशा व टायगर यांनी या नात्याची कबुली दिलेली नसली तरीही. पण आता टायगरच्या बहिणीने म्हणजे कृष्णा श्रॉफ हिने टायगर व दिशाच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. होय, माझा भाऊ 100 टक्के सिंगल आहे, असे कृष्णाने म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर दिशासाठी  टायगर  नाही एका दुसºया अभिनेत्याचे नाव तिने सुचवले आहे.  


‘बाय इन्व्हाईट ओन्ली’ या चॅट शोमध्ये कृष्णाने हजेरी लावली. यावेळी तिने भाऊ टायगर श्रॉफबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. ‘मी किती परखड आणि थेट बोलते हे तुम्हाला ठाऊक आहेच. मी कधीच खोटे बोलत नाही. टायगर अगदी 100 टक्के सिंगल आहे,’ असे ती म्हणाली.
केवळ इतकेच नाही तर ‘मी अतिशय प्रोटेक्टीव्ह बहीण आहे. टायगर अतिशय साधाभोळा मुलगा आहे. त्याचा फायदा घेणे अतिशय सोपे आहे. त्यामुळेच त्याचा फायदा घेताना कुणी दिसले की मी लगेच अलर्ट होते,’असेही ती म्हणाली.


 एखादी मुलगी टायगरला फसवत असेल तर तू काय करशील? असे विचारले असता, तिची अवस्था फार वाईट होईल, असे ती म्हणाली. दिशा पाटनीबद्दलही ती बोलली. मला संधी मिळाली तर मी दिशा पाटनीला आदित्य राय कपूरसोबत ‘सेटअप’ करेल, असे तिने सांगितले.
 अभिनेता जॅकी श्रॉफ यांची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिचे हॉट फोटो सतत चर्चेत असतात. वर्षभरापूर्वी कृष्णाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे टॉपलेस फोटो शेअर केले होते. सोशल मिडियावर तिचे हे फोटो टॉपलेस पोज या टॅगने व्हायरल झाले होते. सध्या कृष्णा Eban Hyams याला डेट करतेय. एबन हा एक ऑस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे. त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया, इस्राईल व भारताचे नागरिकत्व आहे. 


  जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर हा वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते. 25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसत असते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे.  

Web Title: Tiger Shroff’s sister Krishna CONFIRMS he is single and silences rumours of his relationship with Disha Patani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.