ठळक मुद्देटायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ता ‘बागी 3’ या सिनेमात बिझी आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग म्हणून ओळखला जातो. टायगरचे चित्रपटच नाही तर सोशल मीडियावरचे त्याचे व्हिडीओही धुमाकूळ घालतात. सध्या त्याच्या अशाच एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. टायगरने स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘हॅशटॅगमूड’ या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडीओत टायगर एक जीवघेणा स्टंट करताना दिसतोय.
हा स्टंट इतका थरारक आहे की, चाहतेच नाही तर बॉलिवूडचे सुपरस्टाररही त्यावर कमेंट्स देण्यापासून स्वत:ला रोखू श्कले नाहीत. सुनील शेट्टीसह अनेकांनी यावर कमेंट दिली आहे.


 आत्तापर्यंत 20 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे. टायगर आपल्या फॅन्ससाठी सतत अपडेट्स देत असतो. मात्र त्याचे स्टंट आणि डान्स दोन्ही भन्नाट आहेत. वॉर सिनेमातून टायगरनं प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता तो ‘बागी 3’या सिनेमासाठी सज्ज झाला आहे.


टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या ता ‘बागी 3’ या सिनेमात बिझी आहे. यात तो श्रद्धा कपूर व रितेश देखमुखसोबत दिसणार आहे. अंकिता लोखंडे व चंकी पांडे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 7 मार्चला प्रदर्शित होणाºया या सिनेमातही टायगर जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. ‘बागी 3’ हा सिनेमा ‘बागी’चा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगर व श्रद्धा यांची जोडी दिसली होती. यानंतर आलेल्या ‘बागी 2’मध्ये टायगर व दिशा पाटणी मुख्य भूमिकेत होते.

Web Title: tiger shroff video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.