ठळक मुद्दे कृष्णा व एबन लवकरच विवाहबंधनात अडकणार असे मानले जात आहे.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सर्रास तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ सा-यांचे लक्ष वेधून घेतेय. तिच्या सोशल अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे अनेक बोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतात. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात. सध्या कृष्णाचा बॉयफ्रेन्ड एबन हेम्ससोबतचा असाच एक   फोटो व्हायरल होतोय.
काही दिवसांपूर्वी कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड एबन हेम्ससोबतचे किस करतानाचे फोटो शेअर केले होते. कृष्णा आणि एबनचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. आता तिने बॉयफ्रेन्डसोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. सोबत हार्ट इमोजीदेखील टाकले आहे.

 काही दिवसांपूर्वीच कृष्णा व तिच्या बॉयफ्रेन्डचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. मात्र याचदरम्यान कृष्णाने त्याच्यासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. या फोटोनंतर दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या अफवा असल्याचे सिद्ध झाले होते.

 

  कृष्णा व एबन लवकरच विवाहबंधनात अडकणार असे मानले जात आहे.   एकंदर काय तर कृष्णाचा रोमान्स जोरात आहे. एबन हा एक आॅस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे.  एका ताज्या मुलाखतीत कृष्णाने तिच्या आयुष्यात एक व्यक्ती असल्याची कबुली दिली होती. मी ज्याच्यासोबत आहे, आनंदी आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर सोशल मीडियावर एबनसोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.


 
25 वर्षांची कृष्णा सोशल मीडियावर अक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tiger shroff sister krishna shroff shared cute picture with her boyfriend eban hyams get viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.