बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि लव्हशीपमुळे चर्चेत असते. कृष्णाचे इबन हायम्ससह अफेअर सुरु होते. सतत दोघांचे रोमँटीक फोटो ते सोशल मीडियावर शेअक करायेच. मात्र दोघांमध्ये काही कारणामुळे दुरावा आला आणि  गेल्याच वर्षी दोघांचे ब्रेकअपही झाले. 

त्यानंतर, आता तिच्या प्रियकराने  इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, "मी माझ्या एक्सला मी द्वेष करत नाही".नोव्हेंबर 2020 मध्ये कृष्णा श्रॉफने आपल्या इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये इबानबरोबर ब्रेकअपबद्दल खुलासा केला होता. इतकेच नाही तर  त्याच्याबरोबरचे  सर्व फोटोही सोशल मीडियावरुन डिलीच केले होते. 


त्यानंतर इबननेही त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते की,  “जर तुमचे संबंध चांगले नसतील याचा अर्थ नाही की, तुम्ही एकमेकांचा द्वेष करावा.” मी आनंदी आहे, मला माहीत आहे मी तसा नाही. ज्याच्यावर प्रेम केले त्याचा द्वेष करणे चुकीचे आहे.त्याऐवजी मी आदर आणि प्रेम मी देईन. माझ्याबरोबर राहून किंवा माझ्याशिवाय, त्याने आयुष्यात चांगले काम केले पाहिजे अशी माझी नेहमीची इच्छा आहे. "त्याच वेळी कृष्णापासून ब्रेकअपचा झाल्यामुळे इबन आणि टायगर यांच्या मैत्रीवरही काही परिणाम झाला नाही. ब्रेकअपनंतरही टायगर आणि इबन यांच्यात चांगले बॉन्डींग आहे.


टायगर श्रॉफने त्याच्या नवीन गाण्याचे व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा इबनने त्याला  शुभेच्छा दिल्या होत्या, टायगरनेही त्याचे आभार मानले होते.
कृष्णा आणि इबन यांच्या नात्याची सुरुवात 2019 मध्ये जूनमध्ये झाली होती, त्यानंतर त्यांनी जून 2020 मध्ये इन्स्टाग्रामवर एनिवर्सरीचेही सेलिब्रेशन केले होते. पण आता नोव्हेंबर 2020 मध्ये कृष्णाने स्वत: सोशल मीडियाद्वारे इबनमधील ब्रेकअपची माहिती दिली होती.


सिंगल लाइफबाबत कृष्णाने सांगितले होते की, ही लाइफ शानदार आहे. ती म्हणाली, मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी पूर्णपणे माझ्यावर आणि माझ्या बिझनेसवर फोकस करू शकते. आता कोणताही डिस्ट्रॅक्शन किंवा ड्रामा नाही. जे एका रिलेशनशिपमध्ये असतात. इबनपासून वेगळी का झाली यावर ती म्हणाली की, अनेक गोष्टी होत्या ज्यामुळे असं झालं. पण मला या गोष्टी खाजगी ठेवायच्या आहेत. मला वाटतं आम्हाला याची जाणीव झाली आहे की, आम्ही दोघांनी रिलेशनशिपमध्ये राहण्याऐवजी मित्र राहणं जास्त चांगलं होईल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tiger Shroff Sister krishna Shroff Boyfriend Shared An Instagram Story On Breakup Says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.