ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 11:29 AM2021-05-10T11:29:09+5:302021-05-10T11:37:33+5:30

या वयातही आयशा श्रॉफ यांचा फिटनेस पाहून सारेच थक्क झाले आहेत. आयशा यांचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल.

Tiger Shroff Mother Ayesha Shroff's Deadlifts 95kgs, reason of motivation to others | ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद

ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद

Next

बॉलीवुडचा अॅक्शन हिरो म्हणून अभिनेता टायगर श्रॉफने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. टायगर केवळ फायटिंगच चांगली करतो असं नाही तर तो एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. टायगर हा फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. मात्र टायगरलाही फिटनेसच्या बाबतीत त्याची आई आयशा श्रॉफ टक्कर देते. आश्चर्य वाटेल पण हे खरंय. या वयातही आयशा यांचा फिटनेस पाहून सारेच थक्क झाले आहेत. आयशा यांचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल.

 

आयशा जीममध्ये वर्कआऊट करत असल्याचा  हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. आयशादेखील टायगर प्रमाणे जीममध्ये 95 किलो वजनासह डेडलिफ्ट करताना आपल्याला दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत टायगर श्रॉफसुद्धा दिसत आहे. आयशा श्रॉफ या करतात सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असतात.


असून यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या वयातही आयशा यांनी स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.  या व्हिडीओमुळे टायगर नाही तर आयशा यांच्या फिटनेसवर चर्चा रंगत आहे. त्यामुळे टायगरची इतर हिरोंसोबत नाही तर आयशा श्रॉफ यांच्याशी तगडी स्पर्धा सुरु झाली आहे असे म्हणणं चुकीचे ठरणार नाही. मुलंच नाही तर स्वतः आयशा देखील त्यांच्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देत असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. आयशा यांचा हा व्हिडीओ पाहून मुलगी क्रिष्णा श्रॉफने देखील आईचे कौतुक केले आहे.  इतकेच काय तर फिटनेसमुळे चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री देखील आयशा यांच्यापुढे आज फिक्या ठरल्या आहेत हे मात्र नक्की.

आयशा आणि जॅकी श्रॉफ यांची लव्हस्टोरीही खूप खास आहे.खुद्द आयशा यांनीच त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. जॅकीला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी 13 वर्षांची होते, आम्ही तेव्हा एका रेकॉर्ड शॉपवर भेटलो होतो आणि दोन मिनिटे एकमेकांशी बोललो होतो, त्यानंतर मी घरी गेले आणि मी माझ्या आईला सांगितले होते की, मी ज्याच्याशी लग्न करणार त्या व्यक्तीला मी आज भेटले.

 

त्यानंतर मी त्याला तीन वर्षांनी पाहिले. पुढे आम्ही बोलायला सुरुवात केली आणि काही वेळा बाहेर फिरायला गेलो. मला वाटते की, जॅकीशी लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता आणि त्याच्यासारखा व्यक्ती मिळणं हे मी माझे भाग्य समजते. तो संपूर्ण जगातील चांगला नवरा आणि वडील आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tiger Shroff Mother Ayesha Shroff's Deadlifts 95kgs, reason of motivation to others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app