ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर टायगर लवकरच बागी 4, हिरोपंती 2, गणपत व रेम्बोच्या रिमेकमध्ये दिसणर आहे. दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती सलमानसोबत दिसणार आहे.

काल रविवारी बॉलिवूड सेलिब्रिटींची फुटबॉल मॅच रंगली. टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, अपारशक्ती खुराणा, अहान शेट्टी असे सगळे बॉलिवूड स्टार फुटबॉलच्या मैदानात खेळताना दिसते. पण याचदरम्यान टायगर श्रॉफ खेळता खेळता जखमी झाला आणि त्याला चिअर करायला मैदानात आलेल्या दिशा पटानीच्या काळजाचा ठोकाच चुकला.

फुटबॉल मॅचदरम्यान टायगर जखमी झाला. त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. बॉयफ्रेंडची ही अवस्था पाहून दिशाच्या  चेहऱ्याचा जणू रंगच उडाला. जखमी झाल्यामुळे टायगरला मॅच अर्धवट सोडावली जागली. फिजिओथेरपिस्टने लगेच टायगरच्या जखमेवर प्राथमिक उपचार सुरु केले. टायगरची अवस्था दिशाला बघवेना. ती पूर्णवेळ त्याच्या बाजूला उभी राहून त्याला धीर देत होती. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दिशा व टायगर दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र अद्यापही दोघांनी जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. पण दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. कधी हॉलिडे, कधी डिनर डेट एन्जॉय करताना दोघांचेही फोटो चर्चेत असतात. 2016 साली ‘बेफिक्रा’ या म्युझिक व्हिडीओमध्ये टायगर व दिशा पहिल्यांदा एकत्र दिसले होते. यानंतर अहमद खान यांच्या ‘बागी 2’ या सिनेमात ही जोडी एकत्र दिसली.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर टायगर लवकरच बागी 4, हिरोपंती 2, गणपत व रेम्बोच्या रिमेकमध्ये दिसणर आहे. दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती सलमानसोबत दिसणार आहे. ती सध्या ‘राधे: यूवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात व्यग्र आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय  नागिन आणि रणबीर कपूरसोबत लव रंजन दिग्दर्शित एका  चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tiger shroff injured while playing football match disha patani got worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.