बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याच्या नव्या घराला घेऊन चर्चेत आला आहे. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार टायगर पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात या नव्या घरात कुटुंबासह शिफ्ट होणार आहे. स्वत: लक्ष देतायेत. 8 बेडरुमचा नवा आलिशान फ्लॅट टायगरने खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार टायगरचे नवं घर जॉन अब्राहमचा भाऊ एलेन डिझायन करतो आहे. एलेनाने याआधी अनेक बॉलिवूट सेलिब्रेटींचं घरं डेकोरेट केलं आहे.


टायगरच्या वॉर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला. या सिनेमात टायगर आणि ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत होते. यानंतर तो बागी 3 सिनेमात दिसणार आहे. ‘बागी 3’ हा ‘बागी’ फे्रन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी आलेल्या दोन्ही पार्टमध्ये टायगर लीड रोलमध्ये होता.

तिसºया पार्टमध्येही त्याची वर्णी लागली आहे. ‘बागी 3’मध्येही टायगरचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. याशिवाय हृतिक रोशनसोबतच्या एका चित्रपटातही टायगर दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. ऑगस्टमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे.

हा सिनेमा 6 मार्च 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भागीच्या पहिल्या भागात टायगरसोबत श्रद्धा कपूर झळकली होती. तर दुसऱ्या भागात दिशा पटानी मात्र तिसऱ्या कोणाची वर्णी लागलीय ते अद्याप समजू शकलेले नाही. सारा अली खानला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती मात्र साराने टायगरसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजतेय.  त्यामुळे आता या सिनेमात टायगरच्या अपोझिट कोणती अभिनेत्री दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Web Title: Tiger shroff eight bedroom dream house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.