हॉटनेस व अफेयरमुळे चर्चेेेत असणारी अभिनेत्री मलायका अरोराने तिचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मलायका सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिचे फोटो शेअर करत असते.

मलायका जिम, वर्कआऊट, पार्टी, फंक्शन डेटपासून बॉयफ्रेंड अर्जुनसोबत व्हॅकेशनचे फोटो शेअर करत राहते. नुकताच मलायकाने तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. तसं तर मलायका बिकनीमधील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट आहे की आतापर्यंतचा मलायकाचा हा बोल्ड फोटो आहे.


मलायका अरोराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती व्हाईट बिकनीमध्ये दिसते आहे. या फोटोत ती समुद्राच्या पाण्यात बिकनीमध्ये दिसते आहे. ती पाठमोरी उभी असून हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. मलायकाच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सगळ्यात जास्त चर्चेत असणारे कपल आहेत. त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या खाजगी गोष्टींमुळेच ते जास्त चर्चेत असतात. ते दोघे आता नुकतेच व्हॅकेशनवर गेले होते.


मलायका आणि अर्जुनने प्रेमाची जाहिरपणे कबुली दिल्यानंतर आता कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार, असे तुम्हाला वाटत असेल तर असे नाही. कारण, सध्या माझा लग्नाचा कुठलाही विचार नाही. माझी पर्सनल व प्रोफेशनल लाईफ चांगली सुरु आहे. आयुष्यात मी स्थिरावलो, असे मला वाटतेय. मी माझे खासगी आयुष्य कधीच लपवले नाही. त्यामुळे लग्नाचा बेत असेल तर तेही मी जगापासून लपवणार नाही, असे अर्जुन अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता. 

Web Title: Throwback Picture: Malaika Arora's white bikini photo going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.