सेलिब्रेटी बऱ्याचदा त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या अफेयर व रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतात. मग त्यांचे ब्रेकअप असो किंवा अफेयर. बऱ्याच कालावधीपासून अर्जुन कपूर त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतो. आधी अर्जुन कपूरचे सलमान खानची बहिण अर्पितासोबत अफेयर होते. त्यानंतर मलायका अरोरासोबत तो रिलेशनशीपमध्ये आहे.  त्या दोघांचं नातं इथंवर येऊन पोचलं आहे की ते दोघे लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु आतापर्यंत त्या दोघांनी याबाबत चुप्पी साधली आहे.

तुम्हाला माहित आहे का की अर्जुन कपूर व अर्पिता खान यांचे नाते का तुटले होते? खरेतर 2012 साली बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी अर्जुन कपूर सलमान खानची बहिण अर्पिता खानला डेट करत होता. आता तो सलमानची एक्स वहिनी मलायका अरोराला डेट करत आहे आणि आधी तो सलमानच्या बहिणीला डेट करत होता. अर्जुन व अर्पिताचे नाते खूप सीरियस होते आणि ते दोघे दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. या रिलेशनशीपला अर्जुन कपूर पहिले प्रेम म्हणतो. अर्जुनने अर्पिताला डेट करायला सुरूवात केली तेव्हा तो 18 वर्षांचा होता आणि त्याचं वजन 140 किलो होते. अर्जुन कपूरचे ब्रेकअप झाल्यानंतर त्याने लगेच आपल्या फिटनेसकडे लक्ष केंद्रीत केले आणि लाइफस्टाईल बदलली. त्यानंतरच तो बॉलिवूड स्टार बनला.

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने त्याच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते. सोबतच त्याने सलमान खान बद्दल देखील सांगितले होते की त्यांची बॉण्डिंग कशी होती. अर्जुन कपूर म्हणाला होता की, ते माझे पहिले सीरियस रिलेशनशीप होते. आम्ही एकमेकांना डेट करायला सुरूवात केली तेव्हा मी 18 वर्षांचा होतो. हे सलमान खान, कतरिना कैफ, सुश्मिता सेन यांचा चित्रपट  'मैंने प्यार क्यों किया'च्या शूटिंगदरम्यान सुरू झाले होते. मी सलमान भाईसोबत खूप अटॅच होतो. तेव्हाच आमच्या नात्याला सुरूवात झाली. मी तेव्हा खूप घाबरलो होतो. मी त्यांना व त्यांच्या पूर्ण कुटुंबाला आमच्या नात्याबद्दल सांगितले होते. मला वाटत होते की त्यांना सर्वात आधी समजले पाहिजे. ते खूप चांगले वागत होतो. सलमान भाईंना थोडा धक्का बसला होता. मात्र ते लोक व त्यांच्या नात्यांचा आदर करतात. इतकेच नाही तर इतके पार्शियल होते की नेहमी माझी साइड घेत होते.


अर्जुनने या मुलाखतीत अर्पितासोबतच्या ब्रेकअपबद्दलही सांगितले होते. तो म्हणाला की, मी 140 किलो होतो तेव्हा मी निखिल अडवाणी यांच्या सलाम ए इश्क चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. याशिवाय माझी एक गर्लफ्रेंडदेखील होती. मला वाटले की माझे लाइफ योग्य मार्गावरून जात आहे. 22 वर्षापर्यंत मी एका चित्रपटाचं दिग्दर्शन करेन. सगळं सुरळीत चालू होते की अचानक एकदिवस अर्पिताने ब्रेकअप केले. मी एकदम गोंधळून गेलो की काय होणार आणि भविष्यात माझ्यासोबत काय होणार. मात्र ब्रेकअपनंतरही मी सलमान खान यांना भेटतो होतो आणि ते माझ्यासाठी मोठ्या भावासारखे होते.


अर्पिता सोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता अर्जुन मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशीपमध्ये खूश आहे आणि ते दोघे बऱ्याचदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. इतकंच नाही तर व्हेकेशनदेखील एकत्र एन्जॉय करताना दिसतात.

Web Title: Throwback: Arpita Khan did this, breakup with Arjun Kapoor, Arjun revealed himself TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.