throwback aishwarya rai continued to dance for devdas song dola re dola despite bleeding ears? | कानातून रक्त येत असताना नाचत राहिली ऐश्वर्या राय; वाचा, एक Throwback किस्सा
कानातून रक्त येत असताना नाचत राहिली ऐश्वर्या राय; वाचा, एक Throwback किस्सा

ठळक मुद्देया एका गाण्यावर सुमारे 2.5 कोटी रूपये खर्च झाले होते. या गाण्यासाठी एक भव्य सेट उभारण्यात आला होता.

बॉलिवूडच्या सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. हम दिल दे चुके सनम, ताल, जोधा अकबर असे अनेक सिनेमे तिच्या नावावर जमा आहेत. पण या अनेक चित्रपटांपैकी तिचा एक सिनेमा अजरामर असाच म्हणायला हवा. या सिनेमाचे नाव काय तर ‘देवदास’. 
‘देवदास’ या चित्रपटात ऐश्वर्याने साकारलेली पारो कुणीच विसरू शकत नाही. या चित्रपटातील ‘डोला रे डोला’ हे गाणेही असेच यादगार गाणे. या यादगार गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या एका गाण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

आजही हे गाणे हिंदी सिनेमातील सर्वाधिक महागड्या गीतांपैकी एक मानले जाते, ते त्याचमुळे. या गाण्याच्या कोरिओग्राफर सरोज खान यांचे  मानाल तर या एका गाण्यावर सुमारे 2.5 कोटी रूपये खर्च झाले होते. या गाण्यासाठी एक भव्य सेट उभारण्यात आला होता.

या गाण्यात ऐश्वर्याने वजनाने अतिशय जड असे दागिणे घातले होते. तिच्या कानातील कर्णफुले वजनाने इतकी भारी होती की, त्यामुळे तिच्या कानातून रक्त येऊ लागले होते. पण अशाही अवस्थेत तिने गाण्याचे शूटींग पूर्ण केले. याचे फळ अर्थातच तिला मिळाले. पारो साकारणा-या ऐश्वर्याचे प्रचंड कौतुक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर आणि आयफाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

 

Web Title: throwback aishwarya rai continued to dance for devdas song dola re dola despite bleeding ears?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.