बॉलीवुडमध्ये स्टार किड्सची चर्चा होणं काही नवं नाही. मग सुपरस्टार्सच्या मुला-मुलींची बॉलीवुडमध्ये एंट्री असो किंवा त्यांचं खासगी जीवन. त्यांच्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. या सगळ्या स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. 

सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय हा तैमुरच असल्याचे पाहायला मिळतात. नेहमीच सा-यांना त्याच्या बाललीला पाहायला आवडतात. त्याच्या प्रत्येक फोटोला भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही करत असतात. यावर करिनाने अनेक गोष्टींवर चर्चा केली. सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असल्या तरी त्याचं बालपण जपणं ही माझी आणि सैफची पालक म्हणून जबाबदारी आहे असं बॉलीवूडची बेगम अभिनेत्री करीना कपूर खान हिने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. आजचं डिजीटल युग आहे. त्यातच आम्ही कलाकार असल्याने सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असतात.

तरीही तैमूरचे फोटो काढावे असं सगळ्यांना का वाटतं माहिती नाही. मात्र हरकत नाही. तैमूरला कोणत्याही बाळाप्रमाणे आम्ही वाढवत आहोत. त्याचे फोटो काढले जातील म्हणून त्याला बाहेर जाण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. इतर मुलांसारखं त्यालाही जीवन जगणं गरजेचं आहे. त्याला बाहेर जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्याचं बालपण कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.  तैमुरला घेऊन करिना नेहमी पझेसिव्ह असते. 

तिला आता एका गोष्टीची खंत वाटत असल्याचे तिनेच एका मुलाखतीत म्हटले आहे. तिच्या मुलाला दिवंगत पणजोबा आणि आजोबा यांना भेटवू इच्छिते. करिना म्हणाली की, जर कशाही प्रकारे असे होऊ शकले की, मी माझ्या मुलाला त्याचे आजोबा मंसूर अली खान पटौदी आणि दिवंगत पणजोबा राज कपूरजी यांना भेटवू शकले असते, तर ती माझी सर्वप्रथम इच्छा असली असती.’ 

Web Title: This is the thing Kareena Kapoor Khan wanted to do for Timur, but her wish will never be fulfilled-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.