These are the most sexy photoshoots of Priyanka Chopra, take a look | हे आहेत प्रियंका चोप्राचे सर्वात सेक्सी फोटोशूट, एकदा पाहाच

हे आहेत प्रियंका चोप्राचे सर्वात सेक्सी फोटोशूट, एकदा पाहाच

देसी गर्ल आणि पिग्गी चॉप्स अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपला पती निक जोनाससह सध्या आपली फॅमिली लाईफ एन्जॉय करते. वेळोवेळी ती तिचे सगळेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. काही महिन्यांपूर्वी प्रियंकाच्या सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि सेक्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगली होती. या प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा असेच  हॉट फोटो समोर आले आहेत. 


प्रियंकाचा बोल्ड अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. शेअर केलेले हे फोटो अतिशय हॉट आणि बोल्ड अंदाजातले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा हटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे.
एकीकडे फोटोंची खुमासदार चर्चा रंगत असली तरी दुसरीकडे तिच्या संपत्तीचीही चर्चा रंगत आहेत.  

 

प्रियंकाकडे आज 1 अब्ज 92 कोटींच्या घरात इतकी संपत्ती आहे. प्रियंकाचे मुंबईत अनेक घरं आहेत.वर्सेावात प्रियंकाचे तीन फ्लॅट आहेत. तसेच न्युयॉर्कमध्ये पेंट हाऊस आहे. या पेंन्ट हाऊसची किंमत जवळपास 30 कोटी इतकी आहे.मुंबईत आणि गोव्यात तिच्या नावाने जमीनी आहेत.मीडिया रिपोर्टनुसार बागा बीचवरही तिचा एक बंगला आहे.ज्याची किंमत 20 कोटी रूपये आहेत.  नुकतेच प्रियंकाने  बेव्हर्ले हिल्सवर एक घर विकत घेतले आहे. या घराची किंमत 44 कोटी रूपये इतकी आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: These are the most sexy photoshoots of Priyanka Chopra, take a look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.