ठळक मुद्देचित्राचे पती हेमंत यांना या संदर्भात अटक केली असून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. चित्राने एका मालिकेत इंटिमेट सीन दिला होता. पण या सीनमुळे हेमंत नाराज असल्याचे म्हटले जाते.

तमीळ अभिनेत्री विजे चित्राने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आता तिच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. चित्राने कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचे कारण पोलिसांनी कोर्टासमोर सादर केले आहे. चित्राचे निधन ९ डिसेंबरला झाले होते. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला होता. हे हॉटेल मुख्य चेन्नईपासून दूर आहे. 

चित्राचे पती हेमंत यांना या संदर्भात अटक केली असून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. चित्राने एका मालिकेत इंटिमेट सीन दिला होता. पण या सीनमुळे हेमंत नाराज असल्याचे म्हटले जाते. हेमंत यांच्या जामिनावर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी त्यांच्या वकिलाने त्यांची बाजू मांडताना सांगितले की, हेमंत यांनी कधीच त्यांच्या पत्नीवर संशय घेतला नाही की तिचा मानसिक छळ केला नाही. तसेच तिला अभिनयक्षेत्र सोडण्यास सांगितले नाही. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांना माहिती मिळाली आहे की, हेमंत त्यांची पत्नी चित्रावर नेहमीच संशय घेत असत. तसेच तिचा मानसिक छळ करत असत... यामुळेच चित्राने आत्महत्या केली. चित्राने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती आणि त्यावेळी तिचे पती तिच्यासोबत होते. चित्रा चित्रीकरण संपवून रात्री २.३० वाजता हॉटेल रूमवर पोहोचली होती. हॉटेलमध्ये ती तिच्या पतीसोबत राहात होती. हेमंत यांनी पोलिसांना सांगितले होते की, हॉटेल रूमवर पोहोचल्यावर चित्रा आंघोळ करायला बाथरूममध्ये गेली होती. पण खूप वेळ होऊनही ती परत न आल्याने त्यांनी हॉटेल स्टाफला कळवले. ड्युपिलिकेट चावीने दरवाजा उघडला असता चित्रा यांचा मृतदेह सिलिंगला लटकलेला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Television actress VJ Chithra's husband got arrested in suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.